बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शहनाजवर आभाळ कोसळलं, वडिलांनी दिली मुलीच्या प्रकृत्तीबद्दल मोठी माहिती

मुंबई | अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थ आणि अभिनेत्री शहनाज यांची जोडी लोकप्रिय होती. शहनाज आणि सिद्धार्थच्या जोडीला लोकांनी नेहमीच भरभरुन प्रेम दिलं आहे. त्यामुळे सिद्धार्थच्या अचानक जाण्यामुळे शहनाजची अवस्थाही खराब झाली आहे. अशातच शहनाजच्या वडिलांनी तिच्या प्रकृत्तीबाबत माहिती दिली आहे.

शहनाच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे सिद्धार्थच्या मृत्यूची माहिती मिळाली तेव्हा शहनाज शूटिंगवर होती. तसेच ही बातमी समजताच तातडीने शूटिंग थांबण्यात आलं होतं. सिद्धार्थ आणि शेहनाज खूप जवळचे मित्र होते. त्यामुळे सिद्धार्थच्या मृत्यूवर शेहनाजचा विश्वास बसत नसून तिची प्रकृती आता बिघडली असल्याचं शहनाजचे वडिल संतोख यांनी सांगितलं आहे.

शहनाजला सांभळण्यासाठी तिचा भाऊ शाहबाज मुंबईला रवाना झाला आहे. तसेच शाहबाज तिच्याजवळच राहणार असून आपण देखील लवकरच आपल्या लेकीकडे जाणार असल्याचं संतोख म्हणाले. सिद्धार्थच्या मृत्यूवर आमचाही विश्वास बसत नसून आता आपण बोलण्याच्या परिस्थितीत नसल्याचं शेहनाजच्या वडिलांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, बिग बाॅसमध्ये शहनाज आणि सिद्धार्थची जोडी सुपरहिट झालेली की चाहत्यांनी त्यांना ‘सिडनाज’ असं नाव दिलं होतं. चाहते नेहमीच दोघांना एकत्र स्क्रीनवर बघण्यासाठी उत्सुक असायचे. मात्र सिद्धार्थच्या अचानक जाण्याने आता या जोडीला पाहता येणार नाही. शहनाज आणि सिद्धार्थच्या जोडीचे लाखो चाहते असून शहनाजने बिग बाॅसमध्ये सिद्धार्थसाठी मारलेले डायलाॅग देखील लोकांच्या आजून आठवणीत आहेत. तर यातील काही डायलाॅग इतके प्रसिद्ध झाले की त्यावर गाणी देखील बनवण्यात आली आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘मोदींच्या जीवावर विजयी व्हायचं अन्…’, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; पाहा व्हि़डीओ

‘मंदिरं खुली करा नाहीतर…’; मनसेचा ठाकरे सरकारला अल्टिमेटम!

व्हाट्सअॅपचा मोठा दणका! भारतातील ‘तशा’ वापरकर्त्यांची खाती केली बंद

…अन् मुलाने थेट कानशिलात लगावली; लखनऊ मुलीच्या व्हिडीओनंतर ‘या’ व्हिडीओचा धुमाकूळ

“मी एक भारतीय मुस्लीम, मला शासन असलेल्या धर्माची गरज नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More