आश्चर्य वाटेल पण शरीरात झोपेच बटण ‘या’ ठिकाणी असतं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | झोप (Sleep) मानवाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गरज आहे. सात तास झोप झाल्याशिवाय तुम्हाला दिवसभर काम करण्यास उत्साह येत नाही. झोप पूर्ण न झाल्यास शरीरावर त्याचे अनेक वाईट परिणाम होतात. हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळं झोपेचं खोबरं झालं आहे. झोपायची इच्छा असली तरीदेखील झोप लागत नाही.

आता मात्र तुम्ही तुमच्या शरीरातील झोपेच्या बटणाचा वापर करुन निवांत झोप घेऊ शकता. आश्चर्य वाटेल पण आपल्या शरीरात झोप येण्यासाठी एक बटण असतं. या बटणाला अ‌ॅनिमियान (Animian) असं म्हणतात ज्याचा अर्थ शांत झोप असा होतो. रोडोस्लाव (Rodoslav) नामक एक्यूपंक्चर (Acupuncture) तज्ज्ञांनी या बटणाचा वापर करुन पटकन कसं झोपी जायचं सांगितलं आहे.

हे झोपी जाण्याचं बटण आपल्या कानाच्या (Ear) अगदी मागं असतं. हे बटण आपल्या उदासीनता व ताण-तणाव विसरण्यास मदत करतं. झोपी जात असताना पाठीवर झोपा व हे बिंदू हळूवारपणे दाबा. दोन्ही कानाच्या या बिंदूला सुमारे 30 सेकंद दाब द्या. यावेळी छाती व खांदे सैल ठेवा.

यामुळे ह्रदयापर्यंत रक्त नेणाऱ्या वाहिनीला रक्त (blood to the vessel) वाहण्यास मदत होते. यामुळं चटकन झोप येण्यास मदत होते. अॅनिमियन हा असा पाॅईंट आहे ज्यावर दाब दिल्यानं चिंता(concern), तणाव(stress), चक्कर येणे, डोकेदुखी असे त्रास कमी होतात. मन शांत होण्यास देखील मदत होते.

महत्त्वाच्या बातम्या