बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीसांनंतर आता योगी आदित्यनाथ यांनीही दिला ‘मी पुन्हा येईन’चा नारा

लखनऊ | देशातील सर्वात मोठं राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणुक अवघ्या काही महिन्यांवर आहे. म्हणून प्रत्येक पक्षाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या राज्यभर झंझावाती दौरा करत आहेत.

उत्तर प्रदेशची सत्ता राखण्याचं मोठं आव्हान योगी आदित्यनाथ यांच्यासमोर आहे. आतापर्यंत कधीच एका मुख्यमंत्र्याला दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशची सत्ता मिळवता आली नाही. म्हणून ही प्रथा संपवण्यासाठी योगी तयारी करत आहेत. एका प्रश्नाला उत्तर देताना योगी म्हणाले की, मी उत्तर प्रदेशचा सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येणार आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या या बोलण्याने महाराष्ट्रातील विधानसभा 2019 आठवल्या शिवाय रहाणार नाही. राज्यातील तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन असं म्हणत राज्यातील राजकारण तापवलं होतं. मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत.

योगी आदित्यनाथ यांच्यसोबतच भाजपसाठी उत्तर प्रदेशची निवडणूक महत्वाची आहे. भाजपने आपली प्रभारींची यादी जाहीर केली आहे. योगी यांच्या समोर सपा, बसपा आणि काॅंग्रेसच्या प्रियंका गांधी यांचं मोठं आव्हान असणार आहे. परिणामी योगी आदित्यनाथ यांचा मी पुन्हा येणार हा दावा किती खरा ठरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या 

“…तरच प्रेक्षकांना आयपीएल पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये प्रवेश मिळणार”

“गरीब देश कोरोनाने चिरडलेत, लसीकरणासाठी त्यांना मदत करायलाच हवी”

टाइम्स मॅगझिनच्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये दहशतवादी मुल्ला बरादरचा समावेश!

गरिबांचा मसीहा सोनू सूदच्या घरी आयकर विभागाचा छापा, तब्बल 20 तास केली झाडाझडती

‘देव तारी त्याला कोण मारी’; बसच्या चाकाखाली येऊनही दुचाकीस्वार वाचला, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More