बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून सपना चौधरीने आपल्या लेकाला दिलंय राजाचं नाव, पाहा व्हिडीओ!

मुंबई |  बॉलिवुडची अभिनेत्री करीना कपूर खान आणि तिचा पती सैफ अली खान यांच्या तैमूर आणि जहांगीर मुलांची अलिकडेच चर्चा होती. अशातच आता हरियाणाची सिंगर आणि डान्सर सपना चौधरीच्या मुलाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

सपना चौधरीच्या मुलाचा आज पहिला वाढदिवस आहे. त्यामुळे सपना चौधरीने तिच्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. त्या व्हिडीओला ‘मेरे और मेरे चाहनेवालों की तरफ से जन्मदिन की शुभकामनाए मेरे शेर @porushofficial’ असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर सपना चौधरीच्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अनेकांनी मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत.

सपना चौधरी आणि तिचा पती वीर साहूू यांनी त्यांच्या मुलाचं नाव ‘पोरस’ ठेवलं आहे. ‘पोरस’ या नावाबद्दल त्या व्हिडीओमध्ये सपना चौधरीचा पती वीर साहू यांनी सांगितलं आहे. पोरस हा एका सर्वसामान्य घरात आणि परिस्थितीत जन्मलेला असला तरी तो असामान्य आहे. शुरवीरांच्या भूमीचा त्याला वारसा आहे. अशा शब्दांत वीर साहूनी त्याच्या मुलाचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, पोरस हा भारतात होऊन गेलेला पराक्रमी राजा आहे. इसवी सन पुर्व काळात झेलम आणि चिनाब नदीच्या प्रदेशात ‘पोरस’ राजा राज्य करत होता. सिकंदरने ज्यावेळी भारतावर आक्रमन केलं होतं तेव्हा पोरस राज्यांनी सिकंदरचं कौतुक केलं होतं. त्याच राज्याच्या भूमीत सपना चौधरीचा मुलगा जन्माला आला आहे. त्यामुळे पोरस असं नाव सपना चौधरीनं ठेवलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)

थोडक्यात बातम्या-

ह्रदयद्रावक! शेतकरी गाडीच्या चाकाजवळ तडफडत होता, गाडीतून व्यक्ती उतरला अन्…, पाहा व्हिडीओ

किती गोड! अस्वलाच्या पिल्लाला बर्फ पकडताना पाहून नेटकरी म्हणाले सगळा ताण विसरलो, पाहा व्हिडीओ

“शरद पवारांचा दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणजे मगरीचे अश्रू पुसण्याचं काम”

‘आर्यन एक गुणी मुलगा, दुर्देवानं…’; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा आर्यन खानला पाठिंबा!

“मुंबईत अंमली पदार्थाची सर्रास तस्करी होत असताना राज्याचे गृहमंत्री झोपले आहेत का?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More