बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेवटच्या घटका मोजणाऱ्या आईसाठी त्यानं गायलं गाणं, डॅाक्टरलाही रडू कोसळलं

नवी दिल्ली | कोरोनाचा कहर देशभर वाढू लागला आहे. अनेकांनी आपल्या नातेवाईकांना या गंभीर संक्रमणात गमावलं आहे. सर्वात जवळच्या व्यक्तींनाही अनेकांनी गमावलं आहे. रोज हजारो कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. साधारण चार लाखांच्या जवळपास नवे कोरोना रुग्ण देखील आढळून येत आहेत. अशावेळी डॉक्टर, नर्सेस, मेडिकल स्टाफ युद्धपातळीवर काम करत आहेत. त्यांच्यामुळे एक आशेचा किरण सर्वसामान्यांना मिळत आहे.

कोरोनाच्या काळात वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी विविध अनुभव घेतले आहेत आणि काहींनी ते सोशल मीडियावर देखील शेअर केले आहेत. डॉ. दीपशीखा घोष या ट्विटर युजरने देखील एक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे, तो वाचून अनेकांच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार आहे. आई-मुलाची नाळ किती घट्ट असते हे या अनुभवातून स्पष्ट होतं.

सोशल मीडियावर दीपशीखा यांनी केलेली पोस्ट व्हायरल होत आहे. त्या काम करत असणाऱ्या ठिकाणचा प्रसंग दीपशीखा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. दीपशीखा यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘आज माझी शिफ्ट संपत असताना मी एका कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना फोन केला ज्या कदाचितच वाचू शकल्या असत्या. या रुग्णाच्या मुलाने काही वेळ मागितला. त्याने मृत्यूच्या वाटेवर असणाऱ्या त्याच्या आईसाठी एक गाणं गायलं, असं त्यांनी म्हटलं आहे.

त्यांनी पुढे असं लिहिलं आहे की, त्याने तेरा मुझसे है पहले का नाता कोई.. हे गाणं म्हटलं. मी तिथेच फोन पकडून उभी होते आणि त्याच्याकडे बघत होते जो त्याच्या आईकडे बघून गाणं गात होता. नर्सही तिथे आल्या आणि त्या ही स्तब्धपणे उभ्या राहिल्या. त्याला मध्येच रडू कोसळलं पण त्याने गाणं पूर्ण केलं. त्याने त्यांच्या व्हायटल्स विषयी विचारलं, माझे आभार मानले आणि फोन ठेवला, असं त्यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘…तर हे दिवस आपल्याला पाहायला मिळाले नसते’; बच्चू कडू पंतप्रधान मोदींवर कडाडले

चिंता वाढली! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात म्युकरमायकोसिसचे तब्बल 111 रुग्ण

मंत्रीमंडळाच्या भर बैठकीत जयंत पाटील संतापले, म्हणाले…

अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट; मुलगा सिद्धार्थ आणि पीएसह 10 जणांवर गुन्हा दाखल

मुंबईतील सक्रिय रूग्णसंख्या घटली; बरे होणाऱ्यांचं प्रमाण वाढलं, वाचा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More