Oscars 2023 | ‘नाटू नाटू’ गाण्याला मिळाला ऑस्कर पुरस्कार

मुंबई | कलाविश्वातील प्रतिष्ठेचा आणि तितकाच महत्त्वाचा मानला जाणार पुरस्कार सोहळा म्हणजे ऑस्कर (Oscar). या पुरस्कार सोहळ्याला 90 वर्षांपेक्षाही जास्त वर्षांची परंपरा आहे.

95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा (academy awards) लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये दिमाखात पार पडला.

या पुरस्कार सोहळ्यात भारताने यंदा एक नाही तर, दोन पुरस्कारांवर नाव कोरलं आहे. एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

या गाण्यानं ‘बेस्ट ओरिजनल सॉन्ग’ या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात भारताचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ऑस्कर विजेत्यांचे आभार मानले आहेत. असाधारण नाटू नाटू गाण्याची लोकप्रियता वैश्विक आहे. हे एक असं गाणं आहे, जे येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत प्रत्येकाच्या लक्षात राहिल. एमएम कारावनी, चंद्रा बोस आणि इस प्रतिष्ठित सम्मानासाठी संपूर्ण टीमला शुभेच्छा, असं मोदी म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-