बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सपासप कोयत्याचा आवाज काळीज चिरत जातो, वाटते हे वार कोबीवर नसून आपल्याच छातीवर होत आहेत”

कोल्हापूर | नागरिकांकडून कोरोना नियमांचं पालनं होत नसल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना लॉकडाऊनची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाचे पडसाद राज्यात उमटत असल्याचं दिसत आहे. लॉकडाऊनची भीती आणि शेतमालाचे पडलेले दर यामुळं शेतकऱ्यांसमोर संकट उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एक ट्विट केलं आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये शेतकरी शेतातील कोबीचं पीक काढून टाकताना दिसत आहेत. राजू शेट्टी यांनी त्या व्हिडीओला एक कॅप्शन दिलं आहे. लॉकडाऊन होणार या भीतीने भाजीपाला बाजारभाव पडले असून शेतकरी शिवारातच भाजीपाला काढून टाकत आहे. सपासप असा कोयत्याचा आवाज काळीज चिरत जातो, वाटते हे वार कोबीवर होत नसून आपल्याच छातीवर होत आहे, अशा आशयाचं ट्विट राजू शेट्टी यांनी केलं आहे.

आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना मार्चमधील अखेरचे दिवस, होळी, धुलिवंदन असे सण आणि साप्ताहिक सुट्ट्या आहेत. मार्च एंड असल्यानं बँका बंद आहेत. या कारणामुळे राज्यातील विविध बाजारसमित्या बंद आहेत. परिणामी शेतकऱ्यांचं मोठ नुकसान होत आहे.

दरम्यान, आशिया खंडातील अग्रेसर असलेली कांद्याची बाजारपेठ लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व धान्य लिलावाचे कामकाज 7 बंद राहणार आहेत. बाजार समिती 7 बंद असल्याने कोट्यावधीची उलाढाल ठप्प होणार आहे. लासलगाव बाजार समिती सलग 7 दिवस बंद राहिल्यानं शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे

थोडक्यात बातम्या – 

“मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजीबात झालेली नाही”

आमचं ठरलंच तर गेल्यावेळेस सारखं शपथविधी झाल्यावरच कळेल – चंद्रकांत पाटील

“शरद पवार-अमित शहांची भेट; नव्या पिढीला हे राजकारण समजणार नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More