बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अॅम्बुलन्सचं स्पीड इतकं की, व्हिडीओ पाहून लोकंही झाले चकीत, पाहा व्हिडीओ

केरळ | सोशल मिडीयावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणाची कला, कोणाचा स्टंट तर कधी कोणाचा डायलाॅग. मात्र आता सोशल मिडीयावर एका अॅम्बुलन्सचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या अॅम्बुलन्सचा वेग पाहून कोणीही चकीत होईल.

सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या या अॅम्बुलन्सच्या व्हिडीओमध्ये तिचा वेग रहदारीच्या रोडवर देखील तुफान आहे. एवढंच नाही तर रस्त्यात एका सर्कलला भन्नाट टर्न मारताना तर या अॅम्बुलन्सने कमालीचा टर्न मारत कट मारला आहे. गर्दीच्या रस्त्यावर देखील एवढ्या वेगाने अॅम्बुलन्स चालवणे म्हणजे एक कलाच असं म्हणता येईल.

हा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूझरने तर नक्की हा जीव वाचवण्याचा प्रयत्न आहे की घालवायचा?, अशी कमेंटही केली आहे. तर काहींनी त्याच्या स्पीडचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ केरळमधला आहे. तसेच ही अॅम्बुलन्स हाॅस्पीटलकडे जात असतानाचा हा व्हिडीओ आहे.

 

थोडक्यात बातम्या-

इम्तियाज जलील यांचा जल्लोष पाहिल्यानंतर, अमेय खोपकर म्हणतात…

पवार साहेबांसारख्या लोकनेत्याला पाहून तर मी थक्क झालो! – रोहित पवार

नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्यात पत्र व्यवहार; इम्रान यांचं पुन्हा ‘काश्मिर’ गुऱ्हाळ

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात 80 टक्के कोरोनाबाधितांना लक्षणंच नाही

सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यावर केला ‘हा’ गंभीर आरोप

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More