बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेस्टकंट्रोल करणं कुटुंबाला पडलं महागात; पालशेतकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर!

ठाणे | ठाण्यातील डेफोडिल सोसायटीत एका घरात पेस्ट कंट्रोलिंगची फवारणी चिमुकलीच्या जीवावर बेतली आहे. घोडबंदर रोडवरील कासारवडवली परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. मुलीच्या आईची प्रकृती उपचारानंतर स्थिर असली तरी आपली चार वर्षाची चिमुकली गमावल्याने दु:खाचा डोंगर या कुटुंबावर कोसळला आहे.

फॅब्रिकेशनचा व्यवसाय करत असलेले राजू पांडुरंग पालशेतकर यांच्या घरात शनिवारी 13 मार्चला पेस्ट कंट्रोल करण्यात आलं होतं. पेस्ट कंट्रोलचं काम दुपारी 3.30 ला संपलं. त्यानंतर पाच वाजता त्यांची बायको आपल्या चार वर्षांच्या मुलीसह घरात गेली.

पेस्ट कंट्रोल नंतरही केमिकलचा वास येत होता. मात्र, पालशेतकर कुटुंबांने त्याकडे दुर्लक्ष केलं. हाच उग्रवास थोड्या वेळानं पालशेतकर परिवारासाठी घातक ठरला. या वासामुळे त्यांची मुलगी ऋत्वीला रात्री अडीचच्या सुमारास उलटी झाली. बायकोला सुद्धा मळमळ व्हायला लागलं होतं. पेस्टकंट्रोलच्या केमीकलमुळे हा त्रास होत असेल असं गृहित धरून दोघींना थोड्या वेळाने बरं वाटेल, असं पालशेतकरांना वाटलं. मात्र, सकाळनंतर पुन्हा दोघींना त्रास होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दोघींचा त्रास वाढत असल्याने त्यांनी पत्नी आणि मुलीला ताबडतोब घोडबंदर येथील नोबल रुग्णालयात 14 मार्चला उपचारासाठी दाखल केलं.

उपचारादरम्यान, पालशेतकरांच्या पत्नीच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र, सायंकाळपर्यंत मुलीच्या तब्येतीत फारसा फरक पडला नाही. शेवटी संध्याकाळी सहाच्या सुमारास या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे मुलगी गमावल्याचा जबर धक्का  पालशेतकर कुटुंबाला बसला आहे.

थोडक्यात बातम्या

‘शाकाहारी’ महिलेला चुकून ‘मांसाहारी’ पिझ्झा डिलिव्हर करणं पडलं महागात!

सलग 9 दिवस 18 जणांनी केला बलात्कार; राजस्थानमधील घटनेनं देश हादरला!

…अन् 15 कोरोना रूग्णांनी मिळेल त्या वाहनांनी घरी धूम ठोकली!

झोमॅटो डिलिव्हरी बाॅयवर आरोप करणाऱ्या हितेशा चंद्राणी विरोधात गुन्हा दाखल

पाकिस्तानात ‘नोटांचा पाऊस’; पैसे गोळा करण्यासाठी उडाली झुंबड, पाहा व्हीडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More