बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओमिक्रॉनचा प्रसार आणखी वाढणार?; WHO ने दिलेल्या माहितीने जगाचं टेंशन वाढलं

नवी दिल्ली | ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासन देखील सतर्क झालं आहे. द.आफ्रिकेत वेगाने पसरत असलेला ओमिक्रॉन व्हेरिएंट आता तब्बल 23 देशांमध्ये दाखल झाला आहे. त्यात WHOच्या वतीने ओमिक्रॉन विषयी महत्वाची माहिती देण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटना (World Health Organisation) अर्थात WHOचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसू यांनी ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. WHOच्या क्षेत्रात येणाऱ्या 6 पैकी 5 प्रदेशातील तब्बल 23 देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रूग्ण नोंदवले गेले असल्याची माहिती WHO प्रमुख घेब्रेयेसू यांनी दिली आहे.

23 देशांमध्ये ओमिक्रॉनच्या रूग्णांची नोंद झाली असून ओमिक्रॉनच्या रूग्णांची संख्या वाढण्याची शक्यता WHOकडून वर्तवली जात आहे. तर ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार वाढण्याची भीती देखील WHOने व्यक्त केली आहे. ओमिक्रॉनच्या प्रसाराचा वेग बघता जगभरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. (Omicron Spread To Increase Further)

दरम्यान, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सध्या जोखीम असलेल्या देशातून 11 विमानांचं वेगवेगळ्या विमानतळावर आगमन झालं आहे. या 11 विमानांतून 3,476 प्रवासी भारतात परतले आहेत. या सर्व रूग्णांची RTPCR चाचणी करण्यात आली असून 6 प्रवासी कोरोनाबाधित आढळले आहेत. तर या रूग्णांचे नमूने जीनो सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.(Corona Virus Update)

 

थोडक्यात बातम्या-

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

ATMमधून पैसे काढताय! मग जाणून घ्या ‘ही’ नवीन नियमावली

मोठी बातमी! उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात

kunal Kamra म्हणतो, “मी एक कोरोना व्हायरस आहे म्हणून…”

Gold Rate: लग्नसराईत स्वस्त सोने खरेदीची संधी, जाणून घ्या नवे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More