बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘इथं दिसना, तिथं दिसना’; कोविड सेंटर पेशंट मुक्त झाल्यानं कर्मचारी मनसोक्त नाचला

लातूर | कोरोना रूग्णसंख्या मागील काही काळात भरपूर वाढली होती. आता परिस्थिती सुधारत असल्यानं आरोग्य कर्मचाऱ्यांना कामातून थोडा आराम मिळताना दिसत आहे. डाॅक्टर आणि परिचारिका यांचा कोरोना स्थिती सुधारण्यात मोठा वाटा आहे. त्याचबरोबर कोविड सेंटर आणि रूग्णालयात काम करणाऱ्या इतर शिपाई आणि कर्मचाऱ्यांनी कोरोना विरूद्ध लढ्यात मोलाची साथ दिली आहे. अशाच एका कर्मचाऱ्याचा आनंद व्यक्त करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

लातूर जिल्ह्यात समाज कल्याण कोविड सेंटर आहे. त्याठिकाणी मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांना त्याठिकाणी भरती होण्यासाठी जागा नव्हती. परंतू आता त्या कोविड सेंटरमध्ये एकही कोरोना पेशंट भरती नाही. याचाच आनंद तेथील कर्मचाऱ्यांना झाला आहे. सेंटरला काम करणाऱ्या एक युवकाने कोविड सेंटरमध्ये एकही पेशंट नाही म्हणून आनंद व्यक्त केला आहे.

निलेश हांकरे असं या कर्मचाऱ्यांचं नाव सांगण्यात येत आहे. या युवक समाज कल्याण कोविड सेंटरमध्ये काम करत होता. कोविड सेंटर कोरोना रूग्णांपासून मुक्त झाल्यानं त्याला आनंद झाला. त्यानंतर तो ‘इथं दिसना, तिथं दिसना’ गाण्यावर मनसोक्त नाचला. त्याच्या साथिदारानं त्याचा हा व्हिडीओ मोबाईल मध्ये कैद केला.

दरम्यान,  देशातील दरदिवशी वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने अमेरिकेलाही मागे टाकलं. राज्यातही रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्रमध्ये कोरोना अॅक्टीव आकडेवारी ही 5 लाखाच्या घरात आहे. तर राज्यात एकूण 39923 नवेे रूग्ण आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची आकडेवारी सध्या सुधारताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

कोरोना लसीमुळे सीरम मालामाल; नफ्याचा आकडा ऐकाल तर थक्क व्हाल!

‘जान मी तुझीच आहे पण…’; 17 वर्षीय मुलीचं आत्महत्येपूर्वी बॉयफ्रेंडला पत्र

आक्रमक हार्दिक पांड्याला भारतीय संघातून डच्चू, समोर आलं ‘हे’ कारण

13 वर्षाच्या मुलाकडून 25 वर्षीय मोठ्या भावाची हत्या; अत्यंत धक्कादायक कारण आलं समोर

‘धकधक गर्ल’ माधुरीचा 54वा वाढदिवस; जाणून घ्या माधुरी विषयी काही खास गोष्टी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More