बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नारायण राणेंना अटक करण्याची तुमच्यात हिंमत नाही”

पुणे | राज्यात भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. या यात्रेनिमीत्त केंद्रीय मंत्री नारायण राणे काल रायगडमध्ये होते. या यात्रेदरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना नारायण राणेंची जीभ घसरली होती. मुंबईतील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात असतो तर उद्धव ठाकरेंच्या कानशिलात लगावली असती, असं वादग्रस्त वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं.

नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. आज नारायण राणेंच्या वक्तव्याविरूद्ध शिवसेनेकडून राज्यातील वीध विशहरात गुन्हे नोंदवले आहेत. नारायण राणेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस चिपळूनच्या दिशेने रवाना झाले आहेत. तसेच राज्यभर सेनेकडून आंदोलने केली जात आहेत.

नारायण राणे यांची आपली बोलण्याची पद्धत आहे. एखाद्या वाक्यावरून केंद्रीय कॅबीनेट मंत्र्यांना अटक? हे राज्यात काय चालू आहे. केंद्रीय कॅबीनेट मंत्र्यांना अटक ही राजकीय सुडापोटी सुरू आहे. पुढे उद्भवणाऱ्या परिस्थितीस ठाकरे सरकार जबाबदार राहील, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

नारायण राणेंना अटक करूनच दाखवा, तुमच्यामध्ये हिंमत नाही, असं म्हणत भाजप नेते प्रमोद जठार यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. दरम्यान, नारायण राणेंना अटक होते का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

नारायण राणे नारळासारखे, वरून कठोर आणि आतून मऊ मनाचे- चंद्रकांत पाटील

दिल्लीत आमचं सरकार आहे लक्षात ठेवा, बघतो हे किती उड्या मारतात- नारायण राणे

“खऱ्या आईचं दुध पिलं असेल तर समोर या, तुमची औकात दाखवून देऊ”

‘मी नॉर्मल माणूस वाटलो काय?’; गुन्हा दाखल झाल्यानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया

नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक, दगडफेक करत भाजपचं कार्यालय फोडलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More