बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चेहरा भोळा आणि भानगडी सोळा, असं राज्यातील सरकार आहे”

मुंबई | राज्यातील विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून आरोप-प्रत्यारोपांची खेळी सुरू असते. अशातच भाजप पक्षाचे नेते आणि आमदार अशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

‘चेहरा भोळा आणि भानगडी सोळा’, असं हे सरकार आहे, असं म्हणत अशिष शेलार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आज भाजप पक्षाची कार्यकारणीची बैठक पार पडली. त्यावेळी अशिष शेलार बोलत होते. एका पक्षाला आल्याशिवाय पर्याय नव्हता, दुसऱ्या पक्षाचं संपूर्ण राजकारण हे कटकारस्थान करण्यात गेलं आणि तिसऱ्याने आमचा विश्वासघात केला, असं हे सरकार आहे, असं ते म्हणाले आहेत.

तसेच मराठा आरक्षणाबाबत बोलताना शेलार यांनी, मराठा आरक्षणाची बाजू मांडणारे मुकुल रोहतगी यांनी कोर्टात स्पष्टपणे सांगितलं की, मला पूर्णपणे बाजू मांडण्यास सरकारने मदत केली नाही. याला जबाबदार कोण? मराठा आरक्षणात झालेली चुक होती की, हा ठरवून केलेला कट होता. सरकारने याचं आता उत्तर द्यायला हवं, असं शेलार यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राचा नेता कसा असेल यापेक्षा महाराष्ट्र कसा असला पाहिजे, हा प्रश्न आता महत्वाचा आहे. जनतेच्या मतानं, महाराष्ट्राचं नेतृत्व कुणी केलं पाहिजे हे आधीच स्पष्ट केलं होतं. राज्यभर दौरा करणारा दुसरा नेता कुणीच नाही. अहंकारापेक्षा वैराग्यपूजन आमची भूमिका आहे. इथं अहंकाराचं सरकारच नव्हतं, असंही शेलार म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं वाटत नाही”

“ओबीसी नेत्यांचं नेतृत्व संपवताना हा कळवळा कुठे गेला होता?”

डेल्टा प्लस व्हेरिएंटनं टेंशन वाढवलं; राज्यातील निर्बंध पुन्हा कडक होण्याची शक्यता

‘विमानतळाला बाळासाहेबांचं नाव देणं हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट’; भाजप नेत्यांसोबत मनसे आमदार मैदानात

बैठक भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची, चर्चा मात्र अजित पवारांची!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More