राज्य सरकार भ्रष्टाचाराचा आरसा बनला आहे- विखे पाटील
अहमदनगर | भाजप कार्यकर्त्यांचं भविष्य उज्वल आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार टिकाऊ नाही. उलट, विरोधी गटाला उज्वल भविष्य आहे. आगामी पालिका निवडणुकीत नवीन फळी तयार करु. नवीन चेहऱ्यांना ज्येष्ठांची सोबत लागेल. पंचायत समितीच्या निवडणुका भाजप स्वतंत्र लढविणार आहे. पालिकांबाबत लवकरचं निर्णय घेणार आहोत, असे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
श्रीरामपुर येथील कार्यकर्त्यांच्या सहविचार मेळाव्यात ते बोलत होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर तालुक्यासह जिल्ह्यात अनेक हालचाली पाहायला मिळाल्या. राजकारणात प्रत्येकाचा हेतू वेगळा असतो. “तुझं माझं जमेना , तुझ्याविना करमेना. अशी अवस्था राज्य सरकारची झाली आहे, असं म्हणत त्यांनी विरोधीपक्षावर निशाणा साधला.
शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला. लाखो रुपयांची वीजबिले पाठवून सक्तीने वसूल केली. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. राज्य सरकार भ्रष्टाचाराचा आरसा बनला आहे. याबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही. मात्र, सत्ताधाऱ्यांना कधीतरी लोकांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी गावपातळीवर संघटन मजबूत करावे, असे आवाहन विखे पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं.
दरम्यान, तालूक्यातील लोकप्रतिनिधी आपल्यासोबत नाहीत. सहकारी कारखांनदारासह पालिकेतील सत्ताधारी आपल्यासोबत नाहीत. त्यामुळे आपल्याला लढावं लागणार आहे. सरकार कोणाचेही असो, अधिकाऱ्यांच्या नियमांनुसार काम करावे लागते. दुर्दैवाने लोकप्रतिनिधींचा अधिकारी वर्गावर दबाव आहे, असं विखे पाटील म्हणाले.
थोडक्यात बातम्या –
गरीब मुलांच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या धनश्रीची मृत्यूशी झुंज, अनेकांनी केलं मदतीचं आवाहन!
पुण्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ; पुन्हा आढळले 1 हजारांहून अधिक रूग्ण
जॉनी बेयरस्टोला वॉशिंग्टन सुंदर भिडला, भर मैदानात ‘राडा’, पाहा व्हिडिओ
काँग्रेस सर्वात भ्रष्टाचारी पक्ष आहे, तुम्ही भाजपला मत द्या- स्मृती इराणी
Comments are closed.