राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत राज्य सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय
मुंबई | राज्यातील राजकारण सध्या अनेक मुद्द्यांनी गाजत आहे. अशातच मशिदीवरील भोंग्यावरुन तर राज्यातील वातावरण जोरदार पेटलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील धार्मिक स्थळांवर भोंग्यांसाठी परवानगी बंधनकारक असणार आहे, असा निर्णय उद्धव ठाकरे आणि दिलीप वळसे पाटील यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पुढील एक ते दोन दिवसांत भोंग्यांसंदर्भात धोरण ठरवण्यात येईल. मुंबईसह संपूर्ण राज्यासाठी अधिसूचना काढण्यात येईल. यामध्ये सूचना जारी करण्यात येईल.
नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे (Nashik Police Commissioner Deepak Pandey) यांनी जिल्ह्यात भोंग्यांसंदर्भात दिलेल्या आदेशावर शिक्कामोर्तब झाल्याचं दिसून येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील धार्मिक स्थळांवर भोंग्यांसाठी परवानगी बंधनकारक असणार असल्याचं समजतंय.
भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर थेट कारवाई करणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे. धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी लागणार असल्याचं नाशिक आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.
थोडक्यात बातम्या –
महाराष्ट्रासाठी पुढचे दोन दिवस महत्त्वाचे, ‘या’ भागात पाऊस कोसळणार
मोठी बातमी! SBIच्या ग्राहकांना मोठा झटका
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय
पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांचं मोदींना पत्र, केली ‘ही’ मागणी
धक्कादायक! शिवसेना आमदाराच्या पत्नीने राहत्या घरी घेतला गळफास
Comments are closed.