महाराष्ट्र मुंबई

‘येत्या दोन महिन्यात परीक्षा घेणं अशक्य’; परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम

मुंबई | महाराष्ट्रात परीक्षा घेणं शक्य नाही. त्यामुळे केंद्रानेही या भूमिकेला समर्थन द्यावं, असं उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले. तसेच वाईन शॉप आणि विद्यापीठांची तुलना योग्य नाही. येत्या दोन महिन्यात परीक्षा घेणं अशक्य आहे, असंही उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं.

जी भूमिका आम्ही यापूर्वी घेतली होती, ती कायम ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला. परीक्षांबाबत आपत्ती व्यवस्थापनाची यापूर्वी झालेली बैठक आणि आताची बैठक या कालावधीत कोरोनाची स्थितीत आणखी वाढली आहे. कोरोनाची आकडेवारी बघितली आणि कुणाचा आग्रह असेल तर ते विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही, असं उदय सामंत यांनी म्हटलंय.

बंगळुरुमध्ये 50-100 विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली होती. त्यातील निम्मे कोरोना बाधित झाले. जर महाराष्ट्रात परीक्षा घेतली आणि विद्यार्थ्यांना कोरोना झाला तर याची जबाबदारी यूजीसी घेणार का, असा प्रश्न उदय सामंत यांनी केलाय.

महाराष्ट्रात परीक्षा घेण्यास विद्यार्थी आणि पालकांचाही विरोध आहे. राज्यातील प्राध्यापकही परीक्षा घेण्यास तयार नाहीत. राज्य सरकार सद्यस्थितीत परीक्षा घेण्यास असमर्थ आहे. कोरोना गेल्यानंतर परीक्षा घेण्यास सरकार आजही तयार आहे, असंही उदय सामंतांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची मुलाखत घ्यावी, बघू ते मुलाखत देतात का?- संजय राऊत

धक्कादायक! भाजप मंत्र्याच्या मुलाला रोखल्यामुळे पोलिस महिलेला द्यावा लागला राजीनामा

महत्वाच्या बातम्या-

‘गुगल भारतात इतक्या हजार कोटींची गुंतवणूक करणार’; सुंदर पिचई यांनी केली मोठी घोषणा

“राजस्थानमध्ये उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीला राहुल गांधीच जबाबदार”

‘हवे तितके पैसे घ्या पण भाजपत या’; भाजपनं ऑफर दिल्याचा ‘या’ काँग्रेस आमदाराचा दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या