बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्य सरकार कोरोनाची दहशत पसरवत जनतेला वेठीस धरून सामाजिक आणीबाणी लादत आहे”

मुंबई | कोरोना महामारीने जवळपास गेल्या दोन वर्षांपासून देशभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे देशासह महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या पद्धतीने लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे लोक अक्षरश: त्रस्त झाले आहेत. आता भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी याच मुद्यावरुन राज्य सरकारवर गंभीर टीका केली आहे.

लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे सामान्य माणसापुढे जगायचं कसं असा प्रश्न उभा राहिला आहे. यामुळे समाजात असंतोष पसरत आहे. समाजातील हा असंतोष प्रकट होईल या भीतीपोटी महाविकास आघाडी सरकार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दहशत पसरवत आहे आणि सामाजिक आणीबाणी लागू करत आहे, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे. आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे बोलताना उपाध्ये म्हणाले की, तिसऱ्या लाटेची भिती दाखवून सरकार लोकांना घरात बसवत आहे.  मात्र, त्यांनी जगायचं कसं हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणताच प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडून केला जात नाही. कोरोनाच्या नावाखाली जनतेला वेठीस धरून सामाजिक आणीबाणी या सरकारकडून लादली जात आहे.

तसेच राज्य सरकारच्या धोरणहीन कारभारामुळे राज्यातील सर्वच घटकांत राज्य सरकारविरोधात कमालीचा असंतोष आहे. या संतापलेल्या जनतेला तोंड देऊ लागू नये म्हणून महाविकास आघाडीचे सरकार नव्याने निर्बंध लागू करत आहे, असंही केशव उपाध्ये यांनी यावेळी म्हटलंं आहे.

थोडक्यात बातम्या – 

…नाहीतर कोरोनाची तिसरी लाट येण्याअगोदर दुसरीच लाट परत उलटेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘… तो वाघच नसतो त्याला पालतू कुत्रा म्हणतात’; नितेश राणे

डेल्टा प्लस व्हेरिएंटची चिंता करू नका; CSIR शास्त्रज्ञांनी केला मोठा खुलासा, म्हणतात…

‘तुझ्यात जीव रंगला’ मधील वहिणीसाहेबांच्या बाळाचा चेहरा अन् नाव आलं समोर

सकारात्मक बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 50 हजारांच्या खाली, पाहा आकडेवारी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More