आज राज्यसरकारतर्फे कोरोनासंदर्भात ‘या’ 5 महत्वाच्या घोषणा होण्याची शक्यता
मुंबई | आज रात्री 8:30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. आज मुख्यमंत्री महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे पाच मोठ्या घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, जळगाव, औरंगाबाद या शहरांमध्ये काही प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आले होते.
आज पुणे जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन होणार असल्याची घोषणा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. तसेच मुख्यमंत्री राज्यासाठी नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून असतानाच ते खालीलप्रमाणे 5 मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे.
- मुख्यमंत्री आज जिल्हानिहाय निर्बंधांपेक्षा संपूर्ण राज्यासाठीच्या एकत्रित उपाययोजना सांगण्याची शक्यता आहे.
- कोरोनाचा उद्रेक असलेल्या जिल्ह्यांमध्ये दिवसा जमावबंदीचा निर्णय होऊ शकतो.
- सर्व धार्मिकस्थळं पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय होऊ शकतो.
- महाराष्ट्रातील संपूर्ण मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद होऊ शकतात.
- हॉटेल, बार, रेस्टॉरंट यांना फक्त पार्सल सुविधा आणि घरपोच डिलिव्हरी देण्याची सुविधा उपलब्ध राहण्याची शक्यता आहे
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक वाढत असतानाच कडक निर्बंध लागू करून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्यापासून महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन लागू करण्याची दाट शक्यता आहे. आज मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधताना नेमकं काय बोलणार हे पाहणं तितकच महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या –
कोरोना लसीसंदर्भात नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य; केली ‘ही’ मागणी
नियम धाब्यावर बसवुन साताऱ्यात कशी हजारोंच्या संख्येने पार पडली यात्रा, पाहा व्हिडीओ
कोरोना निगेटिव्ह असतांना दिला कोरोना पाॅझिटिव्हचा रिपोर्ट, अन् जिवंतपणीच केलं मृत घोषित
भाजप आमदाराच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडल्याने खळबळ
महाराष्ट्रातील ‘हा’ साखर कारखाना रोहित पवारांच्या कंपनीला भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव मंजूर
Comments are closed.