बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्य सरकार वारकऱ्यांना देखील सोडत नाही, त्यांचीही मुस्कटदाबी करत आहे”

मुंबई | कोरोना महामारीमुळे यंदाच्या वर्षीही पायी वारीवर निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र राज्य सरकारच्या पायी वारीच्या निर्बंधांना न जुमानता पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना पिपंरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावरुन आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

कोरोनामुळे राज्य सरकारनं यंदाही पायी वारीला परवानगी नाकारली आहे. आज पंढरीकडे निघालेल्या  ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांच्यासह काही वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांचा अपमान आहे. राज्य सरकार आता वारकऱ्यांना देखील सोडत नाही, त्यांचीही मुस्कटदाबी करत आहे, अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे.

तसेच महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवलेला असताना वाईन शॉप, बार सुरु करण्याची परवनागी सरकारकडून देण्यात येते. परंतु कित्येक लोकांची श्रद्धास्थाने असलेल्या मंदिरांना उघडण्याची परवानगी का देण्यात येत नाही?, असा सवाल देखील प्रविण दरेकरांनी केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतल्यानंतर दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात स्थानबद्ध केलं आहे. त्यानंतर या ठिकाणी वारकऱ्यांची गर्दी जमू लागली आहे. या ठिकाणी भाजपचे आमदार महेश लांडगे बंडातात्यांच्या भेटीसाठी आल्याची माहिती समजत आहे.

थोडक्यात बातम्या –

एक आजार ज्यामुळे आपलं होत आहे दगडात रुपांतर , ‘या’ चिमुकलीचं शरीर झालं दगडागत!

बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधलं?- देवेंद्र फडणवीस

…तेव्हा माझ्या मनात आत्महत्येचा विचार आला होता- अण्णा हजारे

आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा अखेर गजाआड

नाना पटोलेंच्या ‘त्या’ खळबळजनक पत्राबद्दल नितीन राऊतांचा मोठा खुलासा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More