बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तळीरामांसाठी खुशखबर! ठाकरे सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मुंबई | कोरोनाच्या काळात सरकारचा महसुल मोठ्या प्रमाणात घटला आहे. परिणामी सरकार अनेक गोष्टींवरचा कर कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. तर काही गोष्टींवरील कर वाढवण्याचा निर्णय सुद्धा सरकार घेत आहे. अशातच राज्यातील सरकार मद्यप्रेमींसाठी येत्या काही दिवसांमध्ये एक आंनददायी निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

राज्य सरकारनं 2000 पासून वाईनवर कसलाही अतिरिक्त कर लावला नव्हता. पण सरकार आता 10 रूपये अबकारी कर लावण्याचा विचार करत आहे. राज्य सरकार येत्या काही दिवसांमध्ये किराणा दुकानामध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याची शक्यता आहे.  31 डिसेंबर जवळ आला असताना सरकार अत्यावश्यक दुकानामध्ये वाईनच्या विक्रीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

मद्याच्या तुलनेत वाईनमध्ये अल्पप्रमाणात अल्कोहोल असतं. असं जर झालं तर राज्यात किराणा दुकानं, बेकरी, या दुकानांमध्ये वाईनचे ग्राहक सुद्धा हजेरी लावू शकतात. पण ही वाईन विकत घेताना त्यावर प्रतिलीटर 10 रूपये कर आकारण्यात येणार आहे. यामुळं सरकारला तब्बल 5000 कोटी रूपये महसूल मिळणार आहे.

दरम्यान, सध्या आपल्या राज्यात दरवर्षी तब्बल 70 लाख बाॅटलची विक्री होत असते. सरकारनं हा निर्णय घेतला तर या तब्बल 1 कोटी बाॅटलची विक्री होण्याची शक्यता आहे. सरकार हा निर्णय घेत का हे पहाणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या 

रुपाली पाटील ठोंबरेंचं ठरलं, राष्ट्रवादीतच जाणार?; हे आहेत स्पष्ट संकेत

फडणवीस म्हणतात, “…तर आज ओबीसी आरक्षण गमावण्याची वेळ आली नसती”

“केंद्र सरकार न्यायालयाला खोटं बोलतंय की संसदेला?”

न्यायालयाच्या निकालानंतर छगन भुजबळ आक्रमक, दिला ‘हा’ गंभीर इशारा

“निवडणुका होणारच, ते ही ओबीसी आरक्षणाशिवाय”, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More