बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना संकटात आरोग्य विभागासाठी राज्य सरकारने दिला भरीव निधी

मुंबई | राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर होत आहे. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केला सादर आहे. अजित पवार यांनी दुपारी दोन वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. या अर्थसंकसल्पात कोरानाच्या संकटामुळे भरीव मदत केली आहे. सध्या राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात फोफोवत चालला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात आरोग्या विभागासाठी कोणत्या प्रकारची घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

राज्यातील आरोग्य सेवांसाठी 7 हजार 500 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या काळात काही त्रुटीसमोर आल्या होत्या. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने आरोग्य विभागाने भरीव निधी दिला आहे.

राज्यात नवीन जिल्हा रुग्णालये, मनपा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणार येणार आहेत. महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायतीत सरकार आरोग्य पायाभूत सुविधा पुरवण्यात येणार आहे. महापालिका परिसरात पाच वर्षात पाच हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून यावर्षी 800 कोटी देणार असल्याचंही अजित पवारांनी घोषणा करताना म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा 9 हजार 500 कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मांडला होता. कोरोनाचे संकट, कर्जाचा बोझा, सरकारी तिजोरीतील खडखडाट, कर न वाढवता महसुली तूट कशी भरून काढण्याचं आव्हान अर्थमंत्र्यांपुढे असणार आहे.

थोडक्यात बातम्या-

आकाश ठोसरने शेअर केला कुस्ती खेळतानाचा व्हिडीओ, म्हणाला…

‘महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास…’; अर्थसंकल्पात महिलांसाठी अजित पवारांनी केली मोठी घोषणा!

नियमीतपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अजित पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ झाला- अजित पवार

मुंबईकरांवर पुन्हा एकदा लॉकडाऊनची टांगती तलवार?; पालकमंत्र्यांकडून लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More