बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…अन्यथा येत्या आधिवेशात विधानसभेला घेराव घालू”

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यापासून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांमध्ये आरक्षणाच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच भाजपचे नेते आणि खासदार नारायण राणे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

आरक्षणावर सर्वच नेते आक्रमक भाषणं करत आहेत. परंतू आक्रमकता कृतीतून कधी करणार?, असा सवाल करत आरक्षणाबाबत राज्य सरकारने  लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा येत्या आधिवेशात विधानसभेला घेराव घालू, असा इशारा नारायण राणे यांनी सरकारला दिला आहे. काल 25 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेमध्ये ते बोलत होते.

मी आरक्षण विषयक समितीचा अध्यक्ष झाल्यावर राज्यातील विविध जिल्ह्यातील 18 लाख लोकांचा आणि सुमारे साडेचार लाख कुटुंबांचा सर्वे केला होता. मागासवर्गीय आयोगाने त्याला मान्यताही दिली होती. आरक्षण राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. हे सरकार मराठा समाजाला कधीच आरक्षण देणार नाही. आपआपसात झुंजवता येईल तेवढे सरकार करत असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे.

पाच कोटी मराठा समाज आहे त्यातून एक कोटी समाजाचे लोक जरी एकत्र आले तरी महाराष्ट्र बंद होईल. त्यामुळे राज्यातील मराठा समाजाच्या सर्व संघटनांना एकत्र येण्याचं आवाहन नारायण राणे यांनी केलं.

थोडक्यात बातम्या-

“तुम्ही निवडणुकीचा प्रचार करत होता तेव्हा मी रात्री जागून ऑक्सिजनची व्यवस्था करत होतो”

ठाकरे सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्का; निवडणूक पुढे ढकलण्यास आयोगाचा स्पष्ट नकार

‘महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे आरक्षण टिकलं नाही’; दरेकरांचा हल्लाबोल

“मी सीबीआयशी लढतोय अन् तुम्ही माझ्याशी लढण्याची भाषा करता”

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ; दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटक

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More