बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढील दोन-तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा इशारा

मुंबई | बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात विदर्भासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळे आता राज्यात पुढील दोन-तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. IMD, नं आज दिलेल्या पूर्वानुमाना व इशाऱ्यानुसार राज्यात 19 सप्टेंबर-रविवारपासून पुढचे 3 दिवस काही ठिकाणी गडगडाटासहित जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात याचा प्रभाव असेल, असं हवामान खात्याच्या के. एस होलकर यांनी सांगितलं आहे.

मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन ते चार दिवसात असल्याचं सांगण्यात आलं आहे. याशिवाय कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, मुसळधार पाऊस पडणार असल्यानं नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान खात्यानं दिलेल्या शक्यतेनुसार पाऊस पडला तर नागरिकांनी विनाकरण बाहेर पडू नये, असंही त्यांनी सांगितलं आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

“मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा करणाऱ्यांशी युती कशी होणार?”

“दिलेला शब्द मोडत नाही ही शिवसेनेची खासियत आहे”

मास्क न घातल्यामुळे महिलेला पोलीस ठाण्यात नेऊन तिच्यासोबत केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

तुम्ही कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामं करा- अजित पवार

कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून तरुणानं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More