बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्याला रोज 50 हजार इंजेक्शनची गरज मात्र केंद्राकडून फक्त…- उद्धव ठाकरे

मुंबई | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झालाय. संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रेमडेसीवीरचे रोज किती इंजेक्शन राज्याला लागतात आणि किता मिळतात याबद्दलही जनतेला माहिती दिली.

देशात कोरोनासाठी इंजेक्शन देण्यात येत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात केंद्राने 26 हजार 800 मिळतील, अशी व्यवस्था केली होती. परंतु मी पंतप्रधान यांना विनंती केली होती. त्यानुसार पंतप्रधानांनी विनंती मान्य करून 43 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शनची सोय केली. आज राज्याला दररोज 35 हजार इंजेक्शन मिळत असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

केंद्राकडून राज्याला मिळणारी इंजेक्शन ही पैसे देवून घेत आहोत. त्यामुळे कोव्हीड रूग्णालयात काम करणाऱ्या डाॅक्टर तसेच नातेवाईकांनी रेमडेसीवीरचा अनावश्यक वापरू नका आणि गरजेप्रमाणे त्यांचा वापर करावा आपल्याकडे इंजेक्शनचा तुटवडा नाही. परंतु अनावश्यक वापर केल्यास त्यांचे साईड इफेक्टस होवू शकतात, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, राज्यासाठी गरजेचं असेल तर मी कुणाचंही अनुकरण करायला तयार आहे. यापेक्षा कडक निर्बंध लावायची गरज वाटत नाही. गेल्या वर्षी दोन प्रयोगशाळा होत्या. आता सहाशेच्या आसपास प्रयोग शाळा आहेत. लॉकडाऊन लावलंय पण हाताला लॉक लावून बसलेलो नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

लॉकडाऊन लावलंय पण हाताला लॉक लावून बसलेलो नाही- उद्धव ठाकरे

आज पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

महामंडलेश्वर भागवतानंदगिरी महाराज यांचे निधन, नुकतेच कुंभमेळ्यावरुन परतले होते

“रोहित सरदाना खोटारडा होता, तो कुणाच्याही लक्षात राहणार नाही”

#सकारात्मक_बातमी | श्रीगोंद्यातील दोघा आजोबांची कोरोनावर यशस्वी मात

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More