बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुन्हा राज्यानं पाहिला नानाभाऊंचा कणवाळूपणा! लोककलावंताला दिलं हक्काचं घर

औरंगाबाद | आपल्या गाण्याच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला आंबेडकरी विचार सांगणाऱ्या लोककलावंत म्हणून कडूबाई खरात यांना ओळखलं जातं. काही दिवसांपुर्वी त्यांच्या राहत्या घराचं अतिक्रमणात नुकसान झालं होतं. परिणामी सर्वस्तरातून त्यांना मदत करण्याची मागणी करण्यात येत होती. यादरम्यान काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घर देण्याची घोषणा केली होती.

नाना पटोले यांच्या कानावर जेव्हा खरात यांची गोष्ट गेली तेव्हा नाना यांनी काॅंग्रेसतर्फे त्यांना घर देण्याची घोषणा केली होती. आता ती घोषणा नाना पटोले यांनी प्रत्यक्षात उतरवली आहे. आज नाना पटोले यांच्या हस्ते खरात यांना घर देण्यात आलं. “तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे” हेे लोकप्रिय गीत खरात यांचं आहे. याप्रसंगी काॅंग्रेसचे नेते उपस्थित होते.

लोकप्रिय गीताच्या गायिका कडूबाई खरात यांचे घर अतिक्रमण हटाव मोहिमेत पाडण्यात आले होते. त्यांचा संसार उघड्यावर आला होता. दोन महिन्यांपूर्वी मागासवर्गीय मेळाव्यात त्यांनी माजी सामाजिक न्यायमंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांना भेटून आपल्यावर ओढावलेल्या प्रसंगाची माहिती देऊन मदत करण्याची विनंती केली होती. चंद्रकांत हंडोरे यांनी नाना पटोले यांना कडुबाई खरात यांना घर देण्यासंदर्भात मदत करण्याची विनंती केली असता, त्याच मेळाव्यात नाना पटोले यांनी कडूबाई खरात यांनी घर देण्याचे आश्वासन दिले होते.

दरम्यान, खरात यांच्या मदतीच्या माध्यमातून नाना पटोले यांनी आपली लोककलावंताच्या बाजूनं असणारी बांधिलकी पुन्हा दाखवली असल्याचं बोललं जात आहे. नाना पटोले अध्यक्ष झाल्यापासून राज्यभर दौरे करत असून विविध घटकांच्या समस्या जाणून घेत आहेत.

 

थोडक्यात बातम्या 

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी

मराठी साहित्य संमेलनावरून नियोजक आणि अध्यक्षांमध्ये पत्रापत्री वाद रंगला

भारताला जबरदस्त धक्का! भारताची सलामीवीर जोडी स्वस्तात माघारी परतली

‘गांजाच्या नशेत जर कुणी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर…’; संजय राऊतांची तुफान टोलेबाजी

“राज्य सरकार हॉटेल, लॉन्सला परवानगी देते म्हणजे तिथे काहीही धंदे करा असं सांगत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More