बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोमवारपासून राज्यात शाळेची घंटा वाजणार! सरकारने केली’ ‘ही नवीन नियमावली जाहीर

मुंबई |  कोरोना महामारीमुळे जवळपास गेल्या दीड वर्षीपासून शाळांची दरवाजे बंद करण्यात आली होती. कोरोनाचा धोका लक्षात घेता शाळा सुरू करायच्या का नाहीत याबद्दल खुप प्रश्न निर्माण झाले होते. अखेर राज्यातील शाळेची घंटा सोमवारपासून वाजणार आहे. ग्रामीण भागात इयत्ता 5 वी ते 12 वी आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग भरणार आहेत. त्यासंंबंधी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे.

राज्य सरकारने शाळांबाबत एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षणोत्सव साजरा करण्यास सांगितलं आहे. पहिल्या दिवशी विविध कार्यक्रम घेऊन त्या कार्यक्रमांसह अधिकाऱ्यांच्या भेटींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं संबोधन सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी ऐकण्याबाबतही निर्देश दिले आहेत.

शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्राधान्यानं लसीकरण करून घ्यावं. लसीकरण झालं नाही या कारणास्तव गैरहजर राहता येणार नाही. विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांची 100 टक्के हजेरी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर लसीकरण झालंय त्यांना कोरोना चाचणीचं बंधन नसेल परंतु ती इतरांनी ही चाचणी करावी लागणार आहे.

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ या कार्यक्रमाच्या माध्यामातून  शिक्षक आणि विद्यार्थी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम सगळ्यांनी पहावा असेही जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील नटूकाका यांचं निधन

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

‘आर्यनला श्वास घेण्याची संधी द्या कारण…’; ड्रग्ज प्रकरणाबाबत सुनिल शेट्टीचं मोठं वक्तव्य!

किंग खानचा मुलगा आर्यनच्या अटकेनंतर #SRK_का_बेटा_नशेडी हॅशटॅग होतोय ट्रेंड!

ह्रदयद्रावक! केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांनी आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्यामुळे दोघांचा मृत्यू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More