बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आबा आज तुमची खूप आठवण येतेय, गृहमंत्री म्हणून राज्याला आपणच पाहिजे होता”

मुंबई | ठाकरे सरकारमधील राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी धक्कादायक असे आरोप केले आहेत. राज्यभर चर्चेत असलेल्या सचिन वाझे प्रकरणात परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली होेती. त्यानंतर नाराज झालेल्या परमबीर सिंह यांनी दोन ते तीन दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत.

अनिल देशमुख यांच्यावर पोलीस आयुक्तांनी केलेल्या आरोपावरून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अशातच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी स्व. आर. आर. पाटलांची आठवण काढली आहे.

आबा आज तुमची खूप आठवण येतेय गृहमंत्री म्हणून राज्याला आपणच पाहिजे होता, अलं विनोद पाटील यांनी म्हटलं आहे. विनोद पाटील यांनी यासंदर्भात फेसबुक पोस्ट केली आहे. याआधीही मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी या प्रकरणाचा भाग असलेल्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावर बोलताना आठवण काढली होती.

दरम्यान, आर. आर. पाटील पदावर असताना आमचं म्हणणं योग्य असेल तर संबंधितांवर त्वरित कारवाई करायचे, असं बाळा नांदगावकर म्हणाले होते. मात्र सध्या ठाकरे सरकारला विरोधी पक्ष भाजपने धारेवर धरलं असून ठाकरे सरकार भ्रष्ट असल्याची टीका होत आहे.

थोडक्यात बातम्या- 

“100 कोटी खंडणी प्रकरणाशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध, गृहमंत्र्यांसोबत त्यांनीही राजीनामा द्यावा”

महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे- राज ठाकरे

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी!

अनिल देशमुख यांनी आता स्पष्टीकरण नाही तर राजीनामा द्यावा- देवेंद्र फडणवीस

“बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More