“राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी मी कुणालाही माझा वापर करु देणार नाही”

नवी दिल्ली |काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई राॅबर्ट वाड्रा यांच्या ईडीकडून होणाऱ्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मी कुणालाच राजकीय ब्लॅकमेलेंगसाठी माझा वापर करु देणार नाही, असं रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलं आहे. 

ईडीने काही दिवसांपूर्वी वाड्रा यांच्या कार्यालयावर आणि घरावर छापेमारी केली होती.

गेल्या 5 वर्षांपासून माझ्या आणि माझ्या कुटंबियांना त्रास दिला जात आहे. मी काही पळून जाणाऱ्यांपैकी नाही याच देशात राहणार आहे, असं वाड्रा म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी भावना त्यांनी ५ राज्यांच्या निवडणुकांवर व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या 

-कदाचित आता तुम्हाला लोणावळ्याची ही प्रसिद्ध चिक्की खाता येणार नाही!

वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदमचं विजयानंतर शिवरायांच्या चरणी लोटांगण

-हत्तीची दोन घरांची चाल; अन् मध्य प्रदेशच्या सत्तापटावर काँग्रेसचं भाजपला चेकमेट!

-पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्याची क्षमता काँग्रेसमध्ये नाही- ओवैसी

थापा मारून सदा सर्वकाळ विजयी होता येत नसतं; सामनातून शिवसेनेचा हल्लाबोल