बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात पावसाचा धोका वाढला; ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता

मुंबई | राज्यातील पावसाचा वाढता जोर कायम आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्यानं राज्यातील शेतकरी आता पीक काढणीच्या वेळी अडचणीत सापडला आहे. राज्यात खरीप पिकांची काढणी चालू आहे त्यातच आता पावसाचा जोर देखील वाढत असतानाच आता हवामान विभागानं येत्या पाच- सहा दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रात पावसानं थैमान घातलं आहे. सप्टेंबरच्या शेवटी राज्यात पाऊस अधिक सक्रिय झाल्याचं पहायला मिळतंय.राज्यातील धरणं ओसंडून वाहत आहेत. तर मराठवाड्यात पावसाने पिकांचं मोठं नुकसान होताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. परिणामी राज्यातील पावसाचा जोर अजून वाढण्याचा अंदाज आहे.

पुढील पाच दिवसात राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मागील काही दिवसापासून बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं राज्यातील पाऊस वाढत आहे. येणाऱ्या 12 तासात हवेचा दाब आणखीन वाढण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे 48 तासांत हा दाब ओडिशाकडं सरकण्याची शक्यता आहे.

दरम्यान, येत्या रविवारपासून राज्यात विविध ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता देखील आहे. परिणामी राज्यातील नागरिकांनी सतर्क रहण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी शेतातील काम करत आसताना काळजी घ्यावी, असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या 

अॅम्ब्युलन्सच्या सायनरचा आवाज बदलणार, आता वाजणार ‘ही’ नवी धून

मोठी बातमी! ‘या’ तारखेपासून राज्यातील शाळा सुरु, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

गर्लफ्रेंडचा राग बाॅयफ्रेंडच्या जीवावर बेतला, रागात फेकून मारला फोन अन्…

एकरकमी FRP साठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे डिजिटल आंदोलन

“महाराष्ट्रात काॅंग्रेसला पुन्हा एक नंबरचा पक्ष बनवणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More