बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अनंत गीतेंचं वक्तव्य सत्य परिस्थितीवर आधारीत आहे”

मुंबई | सध्या माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते यांच्या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात खळबळ सुरु झाली आहे. अनंत गीते यांनी दोन काँग्रेस एक विचाराचे कधीही होऊ शकत नसल्याचं वकतव्य केलं होतं. याला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हवा दिल्यानंतर आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अनंत गीते यांनी केलेलं वक्तव्य सत्य परिस्थितीवर आधारित असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. याबाबत बोलताना मी पहिल्यापासून सांगतोय की, महाराष्ट्रात तीन पक्षांची झालेली आघाडी ही अनैसर्गिक आहे, अशा प्रकारची ही आघाडी कधी चालू शकत नसल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला निवडणुका घेण्याचं आव्हान दिलं आहे. महाराष्ट्रातील मुंबई महानगरपालिकेसह मिनी विधानसभेच्या निवडणुका झाल्याच पाहिजेत. महाविकास आघाडीला नक्कीच त्यांची जागा दिसेल, असा टोला देखील फडणवीसांनी लगावला आहे. मात्र या निवडणुका ओबीसी आरक्षणासहीत झाल्या पाहिजेत असं देखील फडणवीस म्हणाले. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही भाष्य केलं आहे.

दरम्यान, शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे यावर पीएचडी करावी लागेल. राऊत हे उद्धव ठाकरेंचं जेवढं कौतुक करत नाहीत त्यापेक्षा ते जास्त शरद पवारांचं कौतुक करत असतात. पण मी हमखास सांगतो, शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यांची, कोणत्याही नेत्याची, कार्यकर्त्याची नार्को टेस्ट करा त्यातून एकच आवाज बाहेर येई की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेनं जावं, असं म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी सेनेवर निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या-

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात पुन्हा घट; वाचा आजची आकडेवारी

“जिथे हिंदूंची लोकसंख्या कमी झाली, तिथे..”; मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य

धक्कादायक! ‘या’ शुल्लक कारणावरून मुंबईत पोलिसाला तृतियपंथीयांकडून मारहाण

शरद पवार आमचे नेते नाही म्हणणाऱ्या अनंत गीतेंना तटकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

शेतकरी जिंकले, SP सचिन पाटलांची बदली थांबली; बदलीसाठी झटणारा आमदार कोण?

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More