औरंगाबाद महाराष्ट्र

आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना पाठवलं रक्तानं लिहिलेलं निवेदन!

बुलढाणा | मराठा समाजासह इतर समाजालाही आरक्षण मिळावं या मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यात रक्ताने स्वाक्षरी करण्याची मोहीम राबवण्यात आली होती. रक्ताने केलेल्या या स्वाक्षऱ्यांचं निवदेन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे.

माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्ह्यात 1 आॅगस्ट ते 6 आॅगस्ट दरम्यान तब्बल 10 हजार लोकांनी रक्तस्वाक्षऱ्या केल्या आहेत. या 10 हजार रक्तस्वाक्षऱ्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलं आहे.

दरम्यान, आरक्षणाचे गांभीर्य लक्षात घेऊन इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लीम व महादेव कोळी समाजाला तातडीने आरक्षण द्यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-आता आरक्षणासाठी लिंगायत समाजही रस्त्यावर उतरणार!

-करूणानिधींच्या अंत्यसंस्कारावेळी समर्थकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज!

-चित्रपट दाखवणं तुमचं काम आहे, खाद्यपदार्थ विकणं नाही!

-चित्रपटगृहामंध्ये जादा दर आकारल्यास इथे करा तक्रार

-‘एक देश, एक निवडणूक’ शक्य आहे का?; काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या