बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; गेल्या 24 तासातील आकडेवारी चिंताजनक

नवी दिल्ली | देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र अशातच कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागल्यानं सर्वांच्या चिंतेत वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

गेल्या 24 तासांतील रुग्णसंख्येने पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला असून गेल्या तीन ते चार दिवसांतील हा सलग मोठा आकडा असल्याचे सांगितलं जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 1 लाख 31 हजार 968 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले असून, 780 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे.

देशातील अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांचा एकूण आकडा आता तब्बल 9 लाख 79 हजार 608 झाला आहे. तसेच रुग्णवाढीचा वेग असाच सुरू राहिल्यास लवकरच 10 लाखांचा आकडा पार होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. दिवसेंदिवस राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरूवारी दिवसभरात राज्यात तब्बल 56 हजार 286 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं, गुरूवारी 376 रूग्णांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत असताना आज हे गंभीर चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर राज्यात सध्या एकूण 5 लाख 21 हजार 317 सक्रिय रूग्णसंख्या आहे.

थोडक्यात बातम्या- 

भयानक दृश्यं, महाराष्ट्रातील ‘या’ शहरात एकाचवेळी 22 कोरोबाधितांवर अत्यसंस्कार

राज ठाकरेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन; केली ‘ही’ मागणी

पुण्यात आरोग्य आणीबाणी; ‘या’ तीन गोष्टींची मोठी कमतरता!

नगरच्या तरुणाची औरंगाबादमध्ये निर्घृण हत्या, हाताविना आढळला मृतदेह

लस संपली! मुंबईतील सर्वात मोठं लसीकरण केंद्र पुरवठ्याअभावी बंद

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More