बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इंग्लंडच्या युवा खेळाडूची वादळी खेळी; केवळ 65 चेंडूत केल्या 136 धावा

लंडन | न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा दारूण पराभव केला. न्यूझीलंडने हा सामना 8 गडी राखून जिंकला. या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर इंग्लडचे फलंदाज जास्त वेळ टिकू शकले नाही. पण दुसरीकडे इंग्लंडच्याच एका फलंदाजानं तुफानी फलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघांची केविलवाणी अवस्था केली होती.

इंग्लंडमध्ये सध्या सुरू असलेल्या टी-20 ब्लास्ट स्पर्धेत युवा खेळाडूनं षटकरांचा पाऊस पाडत वादळी खेळी खेळली आहे. जो क्लार्क असं या खेळाडूंचं नाव आहे. टी-20 ब्लास्ट स्पर्धेत नाॅटिंघमशरकडून खेळताना त्यानं विरोधी संघातील खेळाडूंचा घाम काढला. त्यानं केवळ 65 चेंडूत 136 धावा केल्या आहेत. त्याच्या या खेळाच्या जोरावर नाॅटिंघमशर संघानं 20 षटकांत 7 बाद 217 धावांचा डोंगर उभा केला.

सलामीला आलेल्या जो क्लार्कनं केवळ 49 चेंडूंत आपलं शतक पूर्ण केलं. टी-20 क्रिकेटमधील त्याचं हे तिसरे शतक ठरलं आहे. या खेळीत 11 चौकार व 6 षटकार खेचले आहेत. अखेरच्या षटकात तो बाद झाला. वाॅस्टरशर संघाविरुद्ध त्यानं 21 चेंडूंत 45 धावा केल्या होत्या.

दरम्यान, आयपीएलप्रमाणे इतरत्रही टी 20 क्रिकेट लीग खेळवल्या जातात. त्यामुळे आता क्रिकेटच्या आक्रमक खेळाला महत्व आलं आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 जून ते 22 जून दरम्यान भारत आणि न्युझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं शास्त्रज्ञांचीही उडवली झोप!

‘आताच्या घडीला भाजपला सशक्त पर्याय नाही’; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

“राज ठाकरेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र फार वेगळा आहे, त्यांच्या हाती महाराष्ट्र दिला पाहिजे”

उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

‘कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले, तर…’; अभ्यासातून नवी माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More