पुण्यातील ‘त्या’ सामूहिक बलात्काराचा उलगडा, नराधमाने शारीरिक संबंध ठेवू न दिल्याने चालवली होती गोळी
पुणे | पुण्यातील एका 14 वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. वाढदिवसाच्या पार्टीचं निमीत्त सांगून तिला घरी बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करुन गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाने संपुर्ण प्रकारची माहिती पोलिसांन समोर स्पष्ट केली आहे.
मुलीवर मुख्य आरोपीने बलात्कार केल्यानंतर त्याच्या दोन मित्रांना देखील मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवायचे असल्याचं आरोपीने मुलीला सांगितलं होत. मात्र मुलीने याला नकार दिल्यानंतर तिच्यावर गोळीबार करण्यात आला होता. यादरम्यान मुलीने छातीजवळ मोबाईल पकडला असल्याने ती गोळी मोबाईलला लागून मोबाईल फुटला नाहीतर ती गोळी तिच्या छातीला लागली असती.
आरोपींचा लहान मुलीवर इथपर्यंताचा क्रूरपणा बघून पोलिस देखील हैराण झाले आहेत. ही संपुर्ण घटना पुण्यातील वारजे- माळवाडी येथे घडली असून संबंधीत आरोपी हे अल्पवयीन वयाचे आहेत. यात 24 वर्षीय कृष्णा उर्फ रोहन ओव्हाल, 20 वर्षीय निर्जन उर्फ निलेश शिंदे यांच्यासह तीन जणांचा समावेश आहे.
दरम्यान, संबंधित पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच तातडीने कठोर कारवाई व्हावी , अशी मागणी भाजप महिलाधिकाऱ्यानी पोलिसांकडे केली आहे. याबाबत त्यांनी पोलिसांना निवेदन दिलं आहे.
थोडक्यात बातम्या-
साप मुंगसाच्या भांडणाचा थरार पाहून तूम्हीही व्हाल थक्क! पाहा व्हिडीओ
शरद पवार, अमित शहांच्या भेटीवर ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य; ‘आगे आगे देखो होता है क्या’
धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्याने खोकल्याचं औषध समजून प्राशन केलं विषारी औषध अन्…
‘मुंबई इंडियन्सला हरवणं ही सर्वात मोठी गोष्ट’; भारताच्या ‘या’ माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य
धक्कादायक! चिप्सवरुन झालेल्या भांडणात पतीने पत्नीचे तुकडे करुन फेकलं कचऱ्यात
Comments are closed.