बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देश सोडण्यासाठी अफगाणी नागरिकांची धडपड, विमानतळाचे फोटो पाहून हैराण व्हाल

नवी दिल्ली | गेल्या अनेक वर्षांपासून अफगाणी सरकार आणि तालिबान यांच्यात चालू असलेल्या सत्ता संघर्ष आता एका नव्या वळणावर पोहोचला आहे. रविवारी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूल शांततामय मार्गाने जिंकत अखेर संपुर्ण देशावर कब्जा केला. त्यानंतर अफगाणिस्तानमधील नागरिक कचाट्यात सापडल्याचं दिसत आहे. त्यामुळे अफगाणी नागरिकांची आणि अनेक विदेशी नागरिकांची देश सोडण्याची धडपड चालू झाली आहे.

तालिबानने काबूल शहरावर ताबा मिळवल्यानंतर नागरिक पलायन करताना दिसत आहे. त्यामुळे आता कंधार विमानतळावर काल रात्रीपासून तुडूंब गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. नागरिकांनी थेट विमानतळाच्या रन-वेवर मुक्काम ठोकला असल्यानं विमानाला खाली उतरता देखील येत नाही. तर जी विमानं विमानतळावर आहे, त्या विमानात देखील भरपूर गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय.

काही अफगाणी नागरिक विमानात घुसण्याचा प्रयत्न कराताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी देश सोडण्यासाठी दुसऱ्या मार्गांचा उपयोग करावा, अशी विनंती आता अमेरिकेने अफगाणी नागरिकांना केली आहे. तर राजधानी काबूलमधील हमीत करझाई विमानतळावर देखील हजारो लोकांची गर्दी होताना दिसत आहे. त्यानंतर लगेचच तालिबानने काबूल विमानतळावर कब्जा मिळवला. त्यानंतर अनेक उड्डाने रद्द करावी लागली आहेत.

दरम्यान, काल भारत सरकारने भारतीय नागरिकांना स्वदेशात परत आणलं. परंतु अजूनही काही नागरिक अफगाणिस्तानमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर एअर इंडिया पुन्हा नागरिकांना एअरलिफ्ट करण्याच्या तयारीत आहे. तर अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्तापित व्हावी, अशी इच्छा विदेश मंत्र्यालयाने व्यक्त केली आहे.

पाहा फोटो आणि व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

काबूल पडलं, राष्ट्रपती भवन ताब्यात; अफगाणिस्तानची सुत्रं तालिबानच्या हातात

“औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची हीच योग्य वेळ”

“पालकमंत्र्यांच्या नादी लागाल तर शहरातही दिसणार नाही”

“तुम्ही नारळ फोडत रहा, निवडणुकीत उमेदवारी मात्र मला मिळो”

पवनदीप राजन ठरला 12 व्या सिझनचा इंडियन आयडॉल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More