घरची गरिबी, वडिलांचा पानाचा ठेला, पण क्रिकेटचा नादच बेक्कार, आता थेट इंग्लंड दौऱ्यावर!
नवी दिल्ली | भारतात क्रिकेटला खुप लोकप्रियता आहे. तसेच भारताच्या संघात सामील होण्यासाठी खेळाडूंना कठीण मेहनत घ्यावी लागते. अनेक खेळाडूंनी हालाखीच्या परिस्थितीचा सामना करून संघात स्थान मिळवलं आहे. अशीच एक कहाणी भारतीय क्रिकेट संघासोबत इंग्लड दौऱ्यावर असणाऱ्या खेळाडूबाबतची आहे.
भारतीय संघ इंग्लड विरूद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लड दौऱ्यावर आहे. त्यात असा खेळाडू आहे की, तो एका सर्वसामान्य कुंटुंबात जन्माला आला होता. इंदोरमध्ये त्याच्या वडिलांचा पानाचा ठेला होता. तो खेळाडू 14 वर्षांचा होता तेव्हा रस्त्याचं काम चालू असताना त्याच्या वडिलांचा ठेला तोडून टाकण्यात आला होता. त्यामुळे पुढची काही वर्ष त्यांच्या कुंटुंबाला अडचणींचा सामना करावा लागला होता. अथक मेहनतीच्या जोरावर त्याने आयपीएलमधील संघात जागा मिळवली. आयपीएलमध्येही दमदार प्रदर्शन करत तो खेळाडू आता थेट भारतीय संघासोबत परदेशात आहे. तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून वेगवान गोलंदाज आवेश खान आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळणाऱ्या आवेश खानने सात सामन्यात 14 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या याच दमदार खेळीमुळे त्याला भारतीय संघात सामील करण्यात आलं. ईशांत शर्मा, नॉर्खिया, उमेश यादव यांसारख्या अनुभवी गोलंदाज असलेल्या संघाने त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला संधी दिली. याच संधीच सोनं करून आवेशने स्वत:ला सिद्ध केलं.
दरम्यान, माझा आजचा पर्यंतचा संघर्ष खुप खडतर राहिला आहे. एकवेळ जे लोक मला सांगायचे की तुझं क्रिकेटमध्ये काहीच होणार नाही, आता तेच लोक मला संदेश करून अभिनंदन करतात, असं आवेश आवर्जुन सांगतो.
थोडक्यात बातम्या-
पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी
“मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी केंद्र सरकारला पाठवलेल्या ‘त्या’ प्रस्तावामुळेच आरक्षण रखडलं”
बार्सिलोना सोडल्यावर मेस्सी खेळणार ‘या’ क्लबकडून; कराराची रक्कम ऐकून व्हाल थक्क!
…तर आरक्षणाचं सर्व क्रेडिट केंद्र सरकारला देणार का?- प्रीतम मुंडे
“आता कळलं ठाकरे सरकारमधील ‘हे’ मंंत्री येड्या सारखं का बडबडतात”
Comments are closed.