बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

21 कोटींची बोली लागलेल्या सुलतानने घेतला अखेरचा श्वास! मालक ‘बनीवाल’ करत होता तब्बल ‘इतका’ खर्च

नवी दिल्ली | देशातील सर्वात प्रसिद्ध असलेला ‘सुलतान’ रेड्याचं ह्यदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. राजस्थानातील ‘पुष्कर मेळाव्यात’ सुलतानची बोली तब्बल 21 कोटी रूपये इतकी लागली होती. परंतु सुलतानचा मालक नरेश बेनीवालने त्यावेळी त्याला न विकण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून सुलतान रेड्याची देशभरात खुप चर्चा होती. अनेक लोक सुलतानला बघण्यासाठी हरियाणा जिल्ह्यातील कैथल या ठिकाणी येत असत. परंतु सुलतानने अखेरचा श्वास घेतल्यामुळे सुलतानचा मालक बनीवाल सध्या खुप दु:खी आहे.

हरियाणातील कैथल याठिकाणी नरेश बनीवाल हे दुग्ध व्यवसाय करतात. त्यांच्याकडे म्हशीचा एक खुप मोठा गोठा आहे. यात त्यांनी सुलतान नावाचा एक रेडाही पाळला होता. हा सुलतान जवळपास 1200 किलो वजनाचा होता. त्याच्या खाण्यापिण्यासाठी दररोज 2500 रूपयांचा खर्च येत होता. कधी कधी तो खर्च 3 ते 4 हजार रूपयांवर जात असे. यात 10 किलो खुराक, 10 लीटर दूध, 35 किलो हिरवा आणि सुकलेला चारा यासह त्याला सफरचंद आणि गाजर ही खायला दिला जात असे.

2013 मध्ये झज्जर, कर्नाल आणि हिस्सार येथे झालेल्या राष्ट्रीय पशू सौंदर्य स्पर्धेत सुलतान राष्ट्रीय विजेता ठरला होता. तेव्हापासून सुलतान प्रसिद्धीच्या झोतात आला. सुलतान हा वर्षभरात जवळपास 30 हजार वीर्याचे डोस देत होता. जे 300 रूपये प्रति डोस प्रमाणे विकले जात होते. त्यामधून जवळपास वर्षाला 90 लाख रूपये मिळत होते. याच्या व्यतिरिक्त सुलतान वेगवेगळ्या कार्यक्रमातही बक्षिसे मिळवत होता, अशी माहिती नरेश बनीवाल यांनी दिली आहे.

दरम्यान, सुलतानने वयाच्या 14 वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे बनीवाल यांना सात्वांन भेटण्यासाठी लोक लांबून लांबून येत आहेत. सुलतानमुळे बनीवाल यांची देखील ओळख भारतात झाली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“शेतात गुडघाभर पाणी आहे, नुकसान फक्त टक्केवारीत मोजू नका”

दिल्लीची दंगल अचानकपणे घडली नव्हती, तर…; दिल्ली न्यायालयाने दिला मोठा निर्णय!

पंजाब काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर?

“…तर शेतकरीसुद्धा तुमचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याशिवाय राहणार नाहीत”

“जेव्हा लोक सत्तेसाठी लोभी होतात, तेव्हा ते आपल्या मुली…”; भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More