Top News महाराष्ट्र मुंबई

सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत; शिवसेनेचा लक्ष्मण सवदींना टोला

मुंबई | कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील, अशी अरेरावीची भाषा आज करीत आहेत. यावर शिवसेनेने लक्ष्मण सवदी यांना त्यांनी एक लक्षात घ्यावे सूर्य-चंद्र महाराष्ट्रासही तेजाने प्रकाशमान करतील. आचार्य आत्रे यांच्या भाषेत सांगायचे तर “सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत”, याद राखा! असं म्हणत अग्रलेखातून टोला लगावला आहे.

सूर्य-चंद्राच्या साक्षीने कर्नाटकातून तुमची अरेवारी नष्ट होईल व मराठी बांधवांचा लढा यशस्वी होईल, असा विश्वास शिवसेनेने अग्रलेखात व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्राची बांधिलकी बेळगावसह संपूर्ण सीमा बांधवांशी आहे. सीमाप्रश्नी 69 हुतात्मे देणारा शिवसेना हाच एकमेव पक्ष आहे.

सीमा प्रश्नासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रदीर्घ तुरुंगवास भोगला आहे. लोकशाहीत 20 लाख लोकांच्या भावनेस किंमत नसेल तर तुमच्या त्या लोकशाहीची गरज काय?, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकचे व्यक्तिगत भांडण असण्याचं कारण नाही. एक बेळगावचा वाद सोडला तर दोन राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक नाते इतर राज्यांपेक्षा घट्ट आहे. पण कर्नाटक त्यांच्या हद्दीतील मराठी बांधवांशी निर्घृणपणे वागत आहे, तो प्रकार संतापजनक असल्याचेही शिवसनेने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

धोनीला मागे टाकत दिनेश कार्तिकची नव्या विक्रमाला गवसणी

“गृहमंत्र्यांनी मंदिराच्या भूमीपूजनासाठी ठाकरे आणि पवारांची परवानगी घेतली का?”

राज्यातील जनता सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभी- जयंत पाटील

चेन्नईनं केली अशी करामत की पंजाबला व्हावं लागलं आयपीएलच्या बाहेर!

“काही कामं उरली नसल्याने नारायण राणे आता पुड्या सोडण्याचं काम करतात”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या