बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सूरज सा तेज नहीं मुझमे, दीपक सा जलता देखोंगे, तुम मुझको कब तक रोकोगे”

बीड | शुक्रवारी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी पंकजा मुंडे यांनी भाषणात बोलताना ‘तुम मुझको कब तक रोकोगे’ ही शायरी म्हणतं विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. सावरगावमधील भगवान भक्तीगडावर अनेक मुद्यांवर पंकजा यांनी भाष्य केलं आहे.

यावेळी पंकजा मुंडे यांनी “तुम मुझको कब तक रोकोगे? मुठ्ठी मे सपने लेकर जेबोमे कुछ आशाए, दिल में अरमान यहीं कुछ करजाएँ, सूरजसा तेज नहीं मुझमे, दीपकसा जलता देखोगे, तुम मुझको कब तक रोकोगे, अपनी हद रोषण करने से तुम मुझे कैसे रोकोगे, कैसे टोकोगे”या हिंदी कवितेतून त्यांनी विरोधकांवर तोफ डागली आहे. पंकजा मुंडे यांनी भाषणात टीका करताना कोणाचंही नाव घेतलं नाही.

तुमच्या प्रेमासमोर माझी झोळी कमी पडतेय. घरची पुरणपोळी सोडून उन्हातान्हात मैदानात उपस्थित झालात, त्याबद्दल नतमस्तक होऊन पाया पडते, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. भगवान बाबांची भक्ती आणि गोपीनाथ मुंडे यांची शक्ती ,ही वैभवाची परंपरा सुरू ठेवण्याचं श्रेय तुम्हा सर्वांना आहे, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

दसरा मेळाव्यास उपस्थितांची नावे घेताना पंकजा मुंडे यांनी त्यांच्या शैलीत नावे घेतली आहेत. मंचावर उपस्थित खासदार सुजय विखे पाटील, माझ्या वडिलांचे अत्यंत लाडके कर्डिले साहेब, तीन जिल्ह्यांचे आमदार सुरेश आण्णा धस, प्रविणजी घुले, मोहन दादा, मंचावर उपस्थित धोंडे साहेब, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या बोलण्याचा रोख पक्षांतर्गत आणि विरोधी पक्षातील नेत्यांना होता असं आता बोललं जातंय.

थोडक्यात बातम्या-

‘त्यांनी आपलं मंत्रिपद भाड्यानं दिलंय’; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला

“गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात सांगितलं होतं, हा महादेव जानकर मेला तरी…”

“मी भाजपला सांगते, आता तारखा देणं बंद करा”

“ज्यांनी परप्रांतियांच्या कानाखाली मारली त्यांनी ‘गर्व से कहो हम हिंदू है’ म्हणू नये”

“महाराष्ट्रात फक्त बाळासाहेब ठाकरे वाघ होते, तुमच्यासारख्यांना ती उपमा देता येणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More