ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय!
मुंबई | ओबीसी आरक्षणावर महत्त्वाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडली आहे. त्यात सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वपूर्ण निर्णय दिले आहेत. बांठिया आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील निवडणुका घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
इम्पेरिकल डेटा तयार केल्याशिवाय ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देता येणार नाही, असा निर्णय विकास गवळी यांनी सादर केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला होता आणि आरक्षण रद्द केले होते.
या प्रकरणावर राज्य सरकारने माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या आयोगाची नियुक्ती करून हा डेटा तयार केला आणि सादर केला केला.
न्यायमूर्ती अजय खानविलकर, न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांच्या त्रिसदस्यीय पीठापुढे आज यावर सुनावणी पार पडली.
थोडक्यात बातम्या-
शिवसेनेचा प्रमुख कोण?; रावसाहेब दानवे स्पष्टच बोलले
मोठी बातमी! रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष
कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ, धक्कादायक आकडेवारी समोर
शिवसेना आमचीच म्हणत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का
मोठी बातमी! महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी 1 ऑगस्टला
Comments are closed.