बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतात तयार होणाऱ्या कोरोना लसींचा संपूर्ण साठा सरकार का विकत घेत नाही?- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली | केंद्र सरकार भारतात तयार होणाऱ्या कोरोना लसींचा संपूर्ण साठा का विकत घेत नाही?, असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं विचारला आहे. तर, लसींचा पुरवठा करताना एखाद्या राज्याला प्राधान्य देता येईल का? अशी विचारणाही सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. देशातील कोरोना स्थितीबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुमोटो याचिकेवर आज सुनावणी सुरु झाली. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती रवींद्र भट यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत आहे.

या सुनावणीच्या वेळी केंद्र सरकारनं त्यांच्या उपाययोजना पीपीटीच्या माध्यमातून न्यायालयासमोर सादर केल्या आहेत. मात्र कोरोना लस, औषध आणि ऑक्सिजन पुरवठ्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं असमाधान व्यक्त केलं. कोरोनाची लस निर्मिती करणाऱ्या दोन्ही कंपन्यांमध्ये जनतेचा पैसा आहे, त्यामुळं भारतात तयार होणारी लस ही जनतेसाठीच आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

कोरोना लसींच्या किमतीमधील तफावतीबाबतही सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या केंद्र सरकारला लस 150 रुपयांत देत आहेत. मात्र, राज्य सरकारांना हिच लस 300 ते 400 रुपयांत विकली जात आहे. ही तफावत का? एक देश म्हणून आपण हा 30 ते 40 हजार कोटींचा बोजा का सहन करायचा?, असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं विचारला आहे. तर, केंद्र सरकारनं याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचं मतही सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं.

दरम्यान, सध्या ऑक्सिजनसाठी होणारा आक्रोश आमच्या कानांना स्पष्टपणे ऐकू येत आहे. दिल्लीप्रमाणेच, गुजरात, महाराष्ट्र इथे ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा आहे. ऑक्सिजनची गंभीर समस्या असलेल्या राज्यांना किती ऑक्सिजन पुरवला याची माहिती द्या, असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत.

थोडक्यात बातम्या

Shree

“आता कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही म्हणणार का?”

मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी कोरोनामुळे निधन

“कोरोना तर संपला” असं म्हणणाऱ्या भाजप आमदाराचं कोरोनाने निधन

‘कोरोनाला घाबरु नका, त्याच्याशी दोन हात करा’; मुंबईतील 102 वर्षीय आजीची कोरोनावर मात

‘या’ लोकांना कोरोनाच्या दोन डोसची गरज पडणार नाही; संशोधक म्हणतात… 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More