बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपच्या 12 आमदारांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

मुंबई | महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून झालेल्या गोंधळामुळे भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन (Suspension of 12 MLAs) करण्यात आलं होतं. दरम्यान याप्रकरणी भाजप (BJP) आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं होतं. या 12 आमदारांच्या निलंबनाविरूद्ध भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अशातच आता भाजपला मोठा धक्का बसला आहे. (Supreme Court refused to stay the suspension of 12 MLAs)

सर्वोच्च न्यायालयाने 12 आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात आता या 12 आमदारांना उपस्थित राहता येणार नाही, असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 11 जानेवारीला होणार आहे.

तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन करणं चांगलंच महागात पडलं. त्यावेळी तालिका अध्यक्ष यांच्या समोरचा माईक आणि राजदंड पळवला होता. तर तालिका अध्यक्षांना शिवीगाळ केल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. त्यामुळे या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं.

दरम्यान, निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये भाजपचे आशिष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, जयकुमार रावत, राम सातपुते, नारायण कुचे, हरीश पिंपळे, पराग आळवणी, संजय कुटे, किर्तिकुमार, योगेश सागर यांचा समावेश आहे.

थोडक्यात बातम्या-

‘हा तर घोडेबाजार’; नागपूरातील पराभवानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

MLC Election: देवेंद्र फडणवीसांना मिठी मारताच बावनकुळे यांना अश्रू अनावर

‘रडीचा डाव खेळू नका, आता… ‘; चंद्रकांत पाटलांचं महाविकास आघाडीला खुलं आव्हान

‘विनोदवीर नाना पटोलेंचं हास्यजत्रेपेक्षा मोठं हसं झालंय’; भाजपचा हल्लाबोल

“बावनकुळेंचा विजय म्हणजे महाविकास आघाडीला चपराक”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More