बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आम्ही रात्री 1 वाजेपर्यंत वाट पाहिली, तुमचं हे काय चाललंय?’; न्यायालयाने योगी सरकारला फटकारलं

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे सर्वत्र देश हळहळला होता. याप्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी स्टेटस रिपोर्ट उशिरा सादर केल्यामुळे योगी आदित्यानाथ सरकावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहे.

लखीमपूर खीरी प्रकरणाबाबत तुम्ही सुनावणीच्या काही मिनिटांच्या अगोदर रिपोर्ट सादर केला. तर तो आम्ही इतक्या लवकर कसा वाचणार? किमान एक दिवस आधी रिपोर्ट दाखल करणं गरजेचं होतं. तसेच तो सीलबंद कव्हरमध्ये असला पाहिजे, असं आम्ही काहीच सांगितलं नव्हतं. त्यासाठी आम्ही काल रात्री 1 वाजेपर्यंत वाट पाहिली होती. हे काय सुरू आहे? अशा शब्दात उत्तर प्रदेश सरकारला न्यायालायने सुनावलं आहे. याप्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयाला स्टेटस रिपोर्ट सादर केल्याची माहिती मिळाली आहे.

तुम्ही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, या प्रकरणी 44 साक्षीदारांची तपासणी केली. 164 पैकी 4 साक्षीदारांचे जवाब नोंदवण्यात आले आहेत. तर इतरांचे का जवाब घेतले नाहीत? तसेच आतापर्यंत किती जणांना अटक केली? पुढील आठवड्यापर्यंत नव्याने स्टेटस रिपोर्ट सादर करा, असं सरन्यायाधीश रमणा यांनी उत्तर प्रदेश सरकारला ठणकावून सांगितलं आहे.

दरम्यान, शेतकरी आंदोलनादरम्यान लोकांच्या अंगावर गाडी घातल्यामुळे लखीमपूर खीरी याठिकाणी हिंसाचार घडून आला होता. त्यामुळे सर्वत्र देशात संतापाची लाट उसळली होती. तर अनेक नेत्यांनी आशिष मिश्राला अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आशिष मिश्राला पोलिसांनी अटक केली आणि त्यावर आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे.

थोडक्यात बातम्या-

सुट्टी नाहीच! ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचा जामीन फेटाळला

“अजितदादांनी सांगितल्यामुळे शांत बसलो नाहीतर सोमय्यांचा तोतरेपणा काढला असता”

नरेंद्र मोंदीची का होतेय जेम्स बाँडसोबत तुलना?

सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात घट; सर्वसामान्यांना दिलासा

“महाविकास आघाडीमध्ये राहायचं की नाही याचा लवकरच निर्णय घेऊ”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More