बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशासह राज्यात घातपाताचा कट रचणाऱ्या संशयितांनी ‘या’ कॅम्पमधून घेतलं होतं प्रशिक्षण!

नवी दिल्ली | भारतात अनेक ठिकाणी मोठ्या घातपाताचा कट रचणाऱ्या संशयित 6 दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेतलं असल्याची माहिती त्यांच्या चौकशीमधून समोर आली होती. त्यासोबतच त्यांनी ज्या कॅम्पमधून प्रशिक्षण घेतलं होतं याबाबतची माहिती समजत आहे.

26/11 मध्ये झालेल्या हल्ल्यामधील आरोपी कसाबने ‘थट्टा टेरर’ कॅम्पमधून प्रशिक्षण घेतलं होतं. याच कॅम्पमधून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी प्रशिक्षण घेतलं असल्याचं समजत आहे. हे प्रशिक्षण 15 दिवसांचं होतं. यामध्ये त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी कसा हल्ला करायचा, लोकांना ओलीस ठेवण्याचे तसेच फिदाईन हल्ला करण्याची ट्रेनिंग देण्यात आली आहे.

या चौकशीमध्ये पोलिसांच्या हाती लागलेल्या धक्कादायक माहितीनुसार 6 आरोपींपैकी एक आरोपी हा मुंबईतील सायन परिसरात वास्तव्यास होता. जान मोहम्मद आली असं मुंबईमध्ये वास्तव्यास असणाऱ्या आरोपीचं नाव आहे. तसेच देशात आणखीन दहशतवादी वास्तव करत असल्याची धक्कादायक माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे.

दरम्यान, या टीमचा मुख्य सुत्रधार हा दाऊदच्या संपर्कात होता. पाकिस्तानात लपून बसलेल्या दाऊद इब्राहिम विरुद्ध मागील काही वर्षात कठोर कारवाई करण्यात आली आहे. तसेच ‘डी’ कंपनीच्या संपत्तीचा देखील लिलाव करण्यात आला आहे. त्यामुळे चिडलेला दाऊद आपली ताकद दाखवण्यासाठी ‘ISI’ सोबत मिळून भारताविरुद्ध षडयंत्र रचत आहे.

थोडक्यात बातम्या-

उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ही ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची- जावेद अख्तर

पिल्लाचा मृतदेह सोडेंत घेऊन फिरताना दिसली हत्तीण, डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ व्हायरल

“तुम्ही गाणं म्हटलं की कलाकार आणि लोककलावंतानी म्हटलं की नाचे”

उदयनराजे भोसलेंचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला, म्हणाले…

देवेंद्र फडणवीसांनी ‘ते’ परिपत्रक काढलं म्हणून ओबीसी आरक्षण धोक्यात आलं- नाना पटोले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More