‘या’ कंपन्यांच्या SUV वर मिळतेय तब्बल ‘इतक्या’ रूपयांची सूट

मुंबई | जर तुम्ही SUV कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे. कारण काही कंपन्यांच्या SUV वर सध्या मोठ्या ऑफर सुरू आहेत.

स्कोडा(Skoda), फाॅक्सवॅगन,टाटा ,जीप, महिंद्रा या कांपन्यांच्या SUV वर मोठ्या ऑफर सुरू आहेत. त्यामुळं पैशांची मोठी बचत होणार आहे. म्हणूनच SUV खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे.

सध्या महिंद्रा स्कार्पिओवर(Mahindra Scorpio) २ लाखापर्यंतची सूट मिळत आहे. ही ऑफर डिसेंबर महिन्यापर्यंत मर्यादित आहे. या स्कार्पिओमध्ये इतर खास वैशिष्ट्यांसह 9 नऊ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील मिळत आहे.

जीप मेरेडियनवरही सध्या खास ऑफर सुरू आहे. जीप मेरेडियन भारतातील प्रिमीयर 7 सीटर कारपैकी एक आहे. या कारवर सध्या अडीच लाखापर्यंतची सूट मिळत आहे. या ऑफरचा लाभ फक्त डिसेंबर महिन्यापर्यंतच घेता येईल.

Hyundai Kona EV ही कार दक्षिण कोरियाच्या कंपनीने 2019 मध्ये लाॅन्च केले. यामध्ये प्रिमियर कारची एक्स शोरूम किंमत 23.79 लाख आहे. तर प्रिमियर ड्युअल टोन व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 23.97 लाख आहे. ही कंपनी सध्या दीड लाखांची सूट देत आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ही ऑफर सुरू आहे.

टाटा सफारीवरही(tata safari) सध्या ऑफर सुरू आहे. खास म्हणजे टाटा सफारीने नवीन फिचर अॅड केले आहेत. यामध्ये खास सुरक्षा वैशिष्ट्यांसह टर्बो डिझेल मोटर इंजिन देण्यात येत आहे. टाटा सफारीवर सध्या 1 लाखा पर्यंतची सूट मिळत आहे. ही ऑफरही डिसेंबर महिन्यापर्यंतच मर्यादित असेन.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More