बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तालिबान्यांच्या मनात काय!! अफगाणिस्तानमधील नागरिकांच्या ‘या’ महत्त्वाच्या सेेवाही केल्या बंद

काबूल | तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर अमेरिकेने आपले सैनिक माघारी घेतले.  अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळ देखील आता तालिबानने ताब्यात घेतलं आहे. अफगाणिस्तानमधील अनेक नागरिक संकटात सापडले आहेत. त्यानंतर देशाच्या बाहेर पडण्यासाठी हजारो नागरिकांनी देशाच्या सीमेकडे धाव घेतली आहे. .

बॅंकातील आपले पैसे काढण्यासाठी अफगाणिस्तानमधील लोकांनी बॅंकाबाहेर प्रचंड गर्दी केली आहे. परंतु तालिबानने बॅंकाचेही पैशाचे व्यवहार बंद केल्यामुळे लोकांना पैसेही मिळण्यात अडचणी येत आहेत. या परिस्थितीमुळे देशावर आर्थिक संकटही घोंगावू लागलं आहे. परदेशातून लोकांना मदत पाठवण्याचं ठिकाण काबूल विमानतळही बंद केल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

काबूल विमानतळ बंद केल्यामुळे अफगाणिस्तान आणि इराण दरम्यान असलेल्या इस्लाम काला बॉर्डर पोस्टवर मोठ्या संख्येने अफगाणी नागरिक जमा होत आहेत. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून जवळपास 1 लाख 23 हजार लोकांना सुरतक्षितपणे बाहेर आणलं आहे. मात्र अजूनही त्या ठिकाणी नागरिक अडकून पडले आहेत.

दरम्यान, तालिबानची सत्ता अफगाणिस्तानमध्ये आल्यानंतर सगळ्या जगाचं लक्ष तेथील हालचालींवर लागून आहे. तालिबानने अफगाणिस्तानमधील जवळपास सगळ्या भागावर कब्जा केला आहे. परंतु पंजशीर भागावर अद्यापही तालिबानला कब्जात घेता आलं नाही आहे. त्यामुळे तालिबानच्या विरोधात उभे राहणारे सगळेच जण त्या भागात असल्याची माहिती समोर आली आहे.

थोडक्यात बातम्या-

“शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळांच्या संपत्तीची माहिती द्यावी”

मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजे भोसले घेणार राष्ट्रपतींची भेट

“2024 च्या निवडणुकीत पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार”

“तुम्ही फक्त काळजी घ्या, त्या फेरीवाल्याचं काय ते आम्ही बघू”

हिला कोणीतरी साडी नेसायला द्या, मल्लिका शेरावत झाली ट्रोल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More