बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर तालिबानचं ठरलं! नव्या सरकारमध्ये तालिबान्यांनी केली ‘या’ नेत्याची निवड

काबूल | तालिबानने 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर 20 दिवसातच अमेरिकेने आपले सैनिक माघारी घेतले. त्यानंतर अफगाणिस्तानवर आता पूर्णपणे तालिबानचं वर्चस्व राहिलं आहे. शुक्रवारच्या नमाजानंतर तालिबान नव्या सरकारची घोषणा करणार आहे. तालिबानचा नेता कोण होईल याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे.

टोलोने दिलेल्या बातमीनूसार, नव्या सरकारमध्ये तालिबानी नेता हैबतुल्ला अखुंदजादा हा सरकारचा  सुप्रीम लिडर असेल, त्याच्या आदेशाखाली देशातील पंतप्रधान आणि राष्ट्रपती काम करतील, असं तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचा सदस्य अनामुल्ला समांगनी यांनी सांगितलं आहे.

नवीन सरकार स्थापन करण्याबाबत सगळ्या प्रकारची चर्चा झाली आहे, मंत्रिमंडळासंदर्भातही निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही जे सरकार जाहीर करू ते इस्लामिक सरकार असेल, तसेच लोकांसाठी आमचं सरकार आदर्श निर्माण करेल, अखुंदजादाच्या नेतृत्वात सरकार बनण्यासंंदर्भात कसल्याही प्रकारची शंका नाही, तो सगळ्यांचा प्रमुख असेल, असं समांगनी म्हणाले.

दरम्यान, सध्या अफगाणिस्तानधील आर्थिक परिस्थिती ही ढासळलेली आहे. मोठ्या प्रमाणात लोकांना खायला अन्न मिळत नाही आहे. त्यामुळे भविष्यात तालिबानला जगाच्या मदतीवर अवलंबून राहवं लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अफगाणिस्तानमधील इतर सेवाही तालिबानने बंद केल्या आहेत.

थोडक्यात बातम्या- 

दिलासादायक! पुण्यात आज कोरोना बाधितांच्या रूग्णांमध्ये घट, वाचा आजची आकडेवारी

भारतातील ‘या’ ठिकाणांवर दहशतवाद्यांचा डोळा, गुप्तचेर यंत्रणेकडून हाय अलर्ट जारी

“सरकारमधील लोक तोंडात पान-गुटखा खाऊन बसलेत का?”

मृत्यूच्या 6 दिवस आधी सिद्धार्थनं केलं होतं मोठं काम, तुम्हालाही अभिमान वाटेल!

मृत्यूनंतर सिद्धार्थ शुक्लाच्या टीमची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More