बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अफगाणिस्तानात आता पुरूषांचेही हाल; तालिबान्यांनी घातल्या ‘या’ जाचक अटी

काबूल | तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तेथील महिलांवर अनेक प्रकारची निर्बंध घातली आहेत. त्यामुळे सध्या तालिबानच्या दहशतीखाली अफगाण महिलांना जीवन जगावं लागत आहे. अशातच आता तालिबान्यांनी अफगाण पुरूषांवर देखील बंधने घातली आहेत. या नियमाचे उल्लघंन झाल्यास त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, असंही तालिबान्यांनी सांगितलं आहे.

तालिबान्यांनी अफगाणिस्तानमधील हेल्मांड प्रांतामध्ये नाभिकांसाठी एक आदेश जारी केला आहे. यापुढे जर केशकर्तनालयांमध्ये कोणत्याही पुरूषांची दाढी करू नये तसेच दाढी ट्रीम देखील करू नये. असं काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने या नियमाचे उल्लंघन केल्यास त्याला तालिबान कठोर शिक्षा देईल, असं तालिबान्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.

काबूलमधील अनेक नाभिकांना दाढी न करण्याच्या तालिबानकडून धमक्या येत असल्याचं नाभिकांनी सांगितलं आहे. यासंदर्भात कोणालाही तक्रार करण्याचा हक्क नाहीय, असे पत्रकं हेल्मांडमध्ये तालिबान्यांनी लावली आहेत. त्याचबरोबर आम्ही तुमच्यावर गुप्तपणे पाळत ठेऊन तुम्हाला रंगेहाथ पकडून शिक्षा करू. त्यासाठी त्याला तुम्हीच सर्वस्वी जबाबदार असाल, असंही तालिबान्यांनी अफगाणिस्तानमधील नाभिकांना सांगितलं आहे.

दरम्यान, तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तेथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तालिबानकडून रोज नवीन निर्बंध अफगाण नागरिकांवर लादली जात आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘…तर आम्ही न्याय कुणाकडे मागावा’; करूणा शर्मा प्रकरणावरून पंकजा मुंडेंची खोचक टीका

“भाजपने मनाचा मोठेपणा दाखवला अन् मला दिल्लीत आशीर्वाद मिळाले”

‘…तर ‘त्या’ आमदारावर गुन्हा दाखल करावा’; संभाजी ब्रिगेडची पोलीस आयुक्तांकडे मागणी

मोठी बातमी! आरोग्य विभागाच्या परीक्षेची नवीन तारीख जाहीर

पर्यटन विभागाचा मंत्री माझा मुलगा, आदित्य ठाकरेचा मला अभिमान – उद्धव ठाकरे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More