बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील’; तालिबानचं अफगाणी नागरिकांना नवं फर्मान

काबूल | तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता तालिबानची राजवट सुरू झाली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच्या नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण तयार झालंय. अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन झाल्यानंतर तालिबानने क्रूर फर्मान काढण्यास सुरूवात केली आहे. त्यातच आता शनिवारी काढलेल्या एका फर्मानामुळे अफगाणी नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

टोलो न्युजने दिलेल्या बातमीनुसार तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी एक वक्तव्य केलं होतं. अफगाणी नागरिकांनी त्यांच्याकडील असलेली सरकारी मालमत्ता, हत्यारे दारूगोळा आणि वाहने जमा करावीत, अन्यथा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशारा तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी अफगाणी लोकांना दिला आहे.

शनिवारी तालिबान्यांनी अफगाणी नागरिकांना त्यांच्याकडील सरकारी मालमत्ता, आणि इतर साधने इस्लामिक अमिरातीच्या संबंधित विभागाकडे सोपवावीत, अशी सूचना देण्यात आली आहे. तसेच इमामांना शुक्रवारच्या नमाजच्या दिवशी विशेष उपदेश देण्याचा सल्लाही दिला होता. या सत्तेने दिलेल्या आदेशांचे पालन करण्यासंबंधीत सूचना यावेळी दिल्या होत्या.

दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकं देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना तालिबानी रोखून ठेवत आहेत. विमानतळावर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर तालिबानी दहशतवादी तैनात आहेत. लोकांना विमानतळांवर पोहचून दिलं जात नाही. केवळ परदेशी नागरिकांनाच विमानतळावर जाण्याची परवानगी दिली जात असल्याची माहिती समोर येत आहे.

थोडक्यात बातम्या-

राजनाथ सिंह यांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा अमोल कोल्हेंनी घेतला समाचार

मोठी बातमी! नारायण राणेंना बसला वीजेचा शॅाक

“मी ठाकरे… माझ्या डीएनएमध्ये राजकारण आहे हे त्यांनी दाखवून दिलंय”

‘हा पठ्ठ्या बघा…’; भर कार्यक्रमात अजित पवारांची टोलेबाजी

राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More