बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तालिबानचा नवा फतवा! आता महिला-पुरूषांना उद्यानात सोबत फिरण्यास बंदी

काबूल | दहशतवादी ताकदीच्या जोरावर अफगाणिस्तानची (Afganistan) सत्ता हस्तगत करणाऱ्या तालिबाननं (Taliban) महिला विरोधी कायदे (Rules) अंमलात आणायला सुरूवात केली आहे. अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या अधिकारांवर गदा आणण्याचं काम तालिबान करत आहे.

अफगाणिस्तानमध्ये उद्यानामध्ये (Parks) आता पुरष (Men) आणि महिलांना (Women) एकत्रितपणे फिरता येणार नाही. पुरूषांना बुधवार, गुरूवार, शुक्रवार आणि शनिवारी उद्यान आणि बागेत फिरता येणार आहे. तर महिलांना रविवार, सोमवार, मंगळवार या दिवशी फिरता येणार आहे.

अफगाणिस्तानात तालिबानच्या नव्या नियमांमुळं स्त्री-पुरूष असमानता वाढण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. तालिबान सदस्यांना त्यांची शस्त्रास्त्रे पार्कमध्ये नेण्यास तालिबान सरकारनं बंदी घातली आहे.

दरम्यान, तालिबान सध्या जागतिक स्तरावर आपली प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न करत आहे. पण महिला विरोधी धोरणांचा फटका तालिबानला जागतिक स्तरावर बसत आहे.

थोडक्यात बातम्या – 

मुलींची ‘ही’ पाच सिक्रेट मुलांना माहित असावी, नक्कीच होईल फायदा

शाळकरी मुलांसाठी शिक्षण विभागानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

धमाका होणार! ‘KGF Chapter2’ ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

“आमदारांना घरे देऊ नयेत”; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय राडा; भाजपच्या पाच आमदारांचं निलंबन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More